🕒 1 min read
नाशिक – वाद, आरोप आणि राजीनाम्यांमध्ये अडकलेले अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे आता मन:शांतीच्या शोधात इगतपुरीच्या प्रसिद्ध विपश्यना केंद्रात दाखल झाले आहेत. मुंडे 10 दिवसांच्या विपश्यना शिबिरात सहभागी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात गंभीर आरोप झाले होते. त्यांच्या निकटवर्तीय वाल्मीक कराड याच्यावर हत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
Dhananjay Munde joins Igatpuri Vipassana Centre
याशिवाय, करुणा मुंडे यांच्या घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणातही त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई झाली. वांद्रे न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. या साऱ्या प्रकरणांनी मुंडे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात राहिले.
राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे मुंडेंच्या मंत्रिमंडळात पुनरागमनाची शक्यता कमी झाली असून, आता त्यांनी विपश्यना केंद्रात दाखल होणे हे त्यांच्यासाठी एक मानसिक विश्रांतीचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “छगन भुजबळांना मंत्री केलं, दादांची झोप उडाली!” संजय राऊतांचा अजित पवारांवर जोरदार हल्ला
- हगवणे कुटुंबाला शासनाचा मोठा दणका! वैष्णवी आत्महत्या प्रकरणानंतर मामाचा अतिरिक्त पदभार काढला
- “निर्लज्जपणाचा कळस, लाज वाटायला हवी!” – वैष्णवीच्या चारित्र्यहननावर गिरीश महाजन वकिलावर भडकले