Share

हगवणे कुटुंबाला शासनाचा मोठा दणका! वैष्णवी आत्महत्या प्रकरणानंतर मामाचा अतिरिक्त पदभार काढला

Maharashtra jail official Jalinder Supekar removed from additional responsibilities after Vaishnavi Hagawane case allegations.

Published On: 

Maharashtra jail official Jalinder Supekar removed from additional responsibilities after Vaishnavi Hagawane case allegations.

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ( Vaishnavi Hagawane case ) समोर आलेल्या नावांमध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे पोलीस व कारागृह विभागातील वरिष्ठ अधिकारी जालिंदर सुपेकर ( Jalinder Supekar ) यांचं. हगवणे कुटुंबियांच्या बचावासाठी त्यांचं नाव कथित धमक्यांमध्ये घेतलं गेल्यानंतर, आता शासनाने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

सुपेकर हे सध्या पुण्यातील येरवडा कारागृहाचे महानिरीक्षक आहेत, शिवाय नाशिक, नागपूर आणि संभाजीनगर विभागाचे अतिरिक्त कारभार त्यांच्या जवळ होता. पण या तीनही विभागांचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे.

Jalinder Supekar Removed from Key Jail Posts

या कारवाईमागे प्रशासनाने म्हटले आहे की, वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे कनिष्ठ पदाचा अतिरिक्त कार्यभार ठेवणे योग्य नाही. पण ही कारवाई वैष्णवी प्रकरणातील वादाच्या पार्श्वभूमीवरच झाली असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

अंजली दमानिया यांनीही काही पुरावे सादर करून सुपेकर यांच्यावर 500 कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात खटला सुरु असल्याचं उघड केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषदेत सुपेकर हे आरोपी मुलाचे मामा असल्याचं सांगितले.

आता नागपूर विभागाची जबाबदारी उपमहानिरीक्षक स्वाती साठे, नाशिकची अधीक्षक अरुणा मुगटराव आणि संभाजीनगरची जबाबदारी अधीक्षक वैभव आगे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही