Share

“माझी मुलगी गेलीय… तिच्या चारित्र्यावर शिंतोडे नको!” हात जोडून विनवणी, वडिलांना अश्रू अनावर

Vaishnavi’s father breaks down, pleads lawyers to stop blaming his late daughter’s character. Says they gave car due to dowry pressure.

Published On: 

Vaishnavi Hagawane's father gets emotional, denies dowry harassment claims, pleads not to tarnish his late daughter's image.

🕒 1 min read

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी ( Vaishnavi Hagawane case ) न्यायालयात बुधवारी महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. आरोपींना पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली असली, तरी या प्रकरणात आता वेगळाच वाद निर्माण झाला आहे. आरोपी पक्षाच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला. वैष्णवी एका दुसऱ्या व्यक्तीशी चॅट करत होती. तसेच तिचा स्वभाव आत्महत्येचा होता, तिने पूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला. नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ नसल्याचे वकील विपुल दुशींग यांनी सांगितले.

यावर, वैष्णवीच्या वडिलांनी एका भावनिक पत्रकार परिषदेत घेत सर्व आरोप फेटाळले आहेत. “माझी मुलगी गेलीय… आता तिच्या चारित्र्यावर शिंतोडे नका उडवू. मी हात जोडून विनंती करतो,” असा कळकळीचा आक्रोश वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी केला. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.

Vaishnavi Hagawane’s father gets emotional

कस्पटे यांनी आरोप केला की हगवणे कुटुंबाने फॉर्च्यूनर गाडीची मागणी केली होती. “मी आधी एमजी हेक्टर बुक केली होती, पण त्यांनी धमकी दिली की फॉर्च्यूनर न दिल्यास हेक्टर पेटवून देवू, म्हणून आम्ही फॉर्च्यूनर दिली,” असं ते म्हणाले. त्यांनी सांगितलं की आरोपीकडे गाड्या नाहीत, एकच गाडी आहे तीही त्यांनी दिलेली आहे.

वैष्णवीच्या वडिलांनी हे स्पष्ट केलं की तिच्यावर खोटे आरोप लावून तिचं ( Vaishnavi Hagawane ) चारित्र्यहनन केलं जातंय. “वकील म्हणतात चार चापटा मारणं गुन्हा नाही… ही खूप वाईट गोष्ट आहे. मृत व्यक्तीवर आरोप करणं योग्य नाही,” असंही वैष्णवीचे वडिल ते म्हणाले.

कुटुंब बाळाला घेण्यासाठी गेले असताना निलेश चव्हाणने पिस्तूल दाखवून धमकावलं, असा दावा कस्पटे कुटुंबाने केला. त्याचा या प्रकरणात सक्रीय सहभाग असल्याचं ते म्हणाले. तसंच जालिंदर सुपेकर यांचं नाव पत्रिकेत मामा म्हणून असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेत कस्पटे भावुक होत म्हणाले की, “तुमच्याकडेही मुली असतील, कृपया विचार करा. माझी मुलगी आता नाही, तिच्यावर आरोप नका करू,” असं म्हणत त्यांनी डोळे पुसत सर्वांसमोर हात जोडले.

📌 महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!