🕒 1 min read
मुंबई – शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा त्यांच्या ठसक्याच्या शैलीत राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव वारंवार घेतलं जात असल्यावर प्रतिक्रिया देताना, “तहान लागली म्हणून कोणी गटारातलं गढूळ पाणी पीत नाही,” असा थेट टोला राऊतांनी लगावला.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं केलेलं कौतुक यावरही स्पष्ट भूमिका मांडली. “पवार साहेबांचा परिश्रम, सातत्य आणि संयम या गुणांचं कौतुक करावं लागतं. नुसतं कौतुक करून उपयोग नाही, ते गुण अंगीकारावे लागतात,” असं म्हणत त्यांनी फडणवीसांनाही टोला लगावला.
Sanjay Raut slams Supriya Sule
भाजपवर अविश्वास व्यक्त करत राऊत म्हणाले की, “फडणवीस यांनी भुजबळ यांचंही कौतुक केलं, पण त्यांनाच तुरुंगात टाकलं होतं. भाजपचा काही भरवसा नाही. शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत.” पुढे त्यांनी म्हटलं, “शरद पवार आता कोचिंगची भूमिका घेत आहेत. त्यांच्या विचारधारेनुसार ते भाजपसोबत जाणं शक्य नाही.”
अजित पवारांना झोप देखील लागत नसेल
लोकांना आपल्या प्रॉपर्टी वाढवायच्या आहेत आणि केंद्रीय तपासणी करण्याचा दबाव असतो, त्यामुळे भयभीत होऊन लोक जातात. शरद पवारांना सोडून गेलेले लोक आनंदी मनाने गेली असतील, असं मला वाटत नाही. भुजबळ यांना अजित पवार यांना न विचारताच मंत्री केलं. अजित पवार यांना न विचारता दिल्लीतून त्यांना मंत्री करण्याचे आदेश येतात, अजित पवारांना झोप देखील लागत नसेल, असे म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
संपूर्ण राजकारण स्वार्थी आणि मतलबी झाल्याचं सांगत राऊत म्हणाले, “कोणी कुणाच्या हातात राहत नाही. आम्ही घडवलेल्या काही पिढ्या गेल्या, त्याचं काय करणार?”
सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांनी शेवटी म्हटलं, “तहान लागतेच, पण कोणत्या डबक्यात उडी मारायची हे पाहावं लागतं. महासागरात उडी घेतली तरी तिथे लाटा आहेत, गर्दी आहे, आणि अस्तित्वासाठी धडपड चालू आहे.”
📌 महत्वाच्या बातम्या
- “घरगुती हिंसाचाराचं समर्थन?” वकील दुशींगची सनद रद्द करा! अंजली दमानिया आक्रमक
- ‘पोरीला मारलं, आता तिच्या चारित्र्यावर..! लांडग्याच्या पुढची औलाद…’ हगवाणेंच्या वकिलांवर चित्रा वाघ संतापल्या
- “गिरीश महाजन एका शिक्षकाचा मुलगा, तरी कोट्यवधीची मालमत्ता?” एकनाथ खडसेंचा मोठा गोप्यस्पोट