🕒 1 min read
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गिरीश महाजन वारंवार माझ्यावर खोटे आरोप करत असल्याचा आरोप करताना, “माझ्या बायकोला जेलमध्ये पाठवण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले,” असं खडसे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “गिरीश महाजन हे एका शिक्षकाचे पुत्र आहेत. पूर्वी भाड्याच्या खोलीत राहत होते. मग आज कोट्यवधींची मालमत्ता त्यांच्या नावावर कशी?” असा थेट सवाल खडसेंनी केला.
Eknath Khadse slams Girish Mahajan
इंदूर-हैदराबाद महामार्ग प्रकल्पात खडसेंनी जमीन विकत घेतल्याचा महाजन यांचा आरोप फेटाळून लावत, “सात वर्षांचा असताना माझ्या नावावर 100 एकर जमीन होती,” असंही खडसेंनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर, “महाजन यांनी धरणात जाणारी जमीन विकत घेऊन 15 कोटी रुपये हडप केल्याचा” आरोपही खडसे यांनी लावला.
एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गिरीश महाजन वारंवार माझ्याबाबत फेकाफेकी करत असतात. मागच्या वेळेसही गिरीश महाजन म्हणत होते की कोथळीची ग्रामपंचायत खडसेंची नाही म्हणून, पण त्यांना सांगायचं आहे की गेल्या 37 वर्षांपासून कोथळीची ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- देर आये, दुरुस्त आये; हगवणे प्रकरणात रुपाली चाकणकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
- “चारित्र्यावर संशय- चार कानाखाली मारणं छळ नाही, म्हणणाऱ्या वकिलाच्या चार कानशिलात लावणाऱ्याचा सत्कार करीन” – खडसे
- “तो दोषी असेल तर फाशी द्या, पण आरोपी का करता?” हगवणेंच्या वकिलांचा निलेश चव्हाणबाबत स्फोटक युक्तिवाद!