🕒 1 min read
पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. हगवणे कुटुंबीयांच्या छळामुळे वैष्णवीने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप होत असतानाच आता कुटुंबातीलच सून मयुरी जगताप ( Mayuri Jagtap) हिनेही गंभीर आरोप केले होते. त्याअनुषंगाने आता राज्य महिला आयोगाने कारवाईला गती दिली असून आयोगाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.
मयुरी जगतापने 6 नोव्हेंबर 2024 रोजी पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात मानसिक आणि शारीरिक छळाची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर 7 नोव्हेंबरला महिला आयोगाने पोलिसांना कारवाईसाठी पत्र दिलं होतं. मात्र 60 दिवस उलटल्यानंतरही आरोपपत्र दाखल झालं नसल्याचा ठपका पुणे पोलिसांवर ठेवला आहे.
Mayuri Jagtap accused Hagwane family of harassment
या विलंबाबाबत आयोगाने पोलिस अधीक्षकांकडून 26 मे रोजी अहवाल मागवला. त्यात पोलिसांनी कारवाईत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला. या अहवालाच्या आधारे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आरोपपत्र विलंबाची चौकशी करावी, अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या पत्रामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत असून आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “चारित्र्यावर संशय- चार कानाखाली मारणं छळ नाही, म्हणणाऱ्या वकिलाच्या चार कानशिलात लावणाऱ्याचा सत्कार करीन” – खडसे
- “तो दोषी असेल तर फाशी द्या, पण आरोपी का करता?” हगवणेंच्या वकिलांचा निलेश चव्हाणबाबत स्फोटक युक्तिवाद!
- वैष्णवीचे ‘ते’ चॅटिंगचे व्हिडिओ व्हायरल केले असते, पण…! हगवणेंच्या वकिलांचा खळबळजनक दावा!