🕒 1 min read
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सुनावणी आज पुण्यात पार पडली. या सुनावणीवेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेणारे विधान करत खळबळ उडवून दिली. वैष्णवीच्या व्हॉट्सअॅप चॅटचा दाखला देत तिच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप साफ फेटाळले.
वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितले की, “कोणतंही चॅटिंग झालं नाही, सगळे आरोप खोटे आहेत. आम्हाला आमच्या मुलीवर विश्वास आहे आणि आम्हाला न्यायव्यवस्थेवरही पूर्ण विश्वास आहे. हे सगळं दिशाभूल करण्याचं काम आहे.”
वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनीही वकिलांच्या आरोपांना उत्तर देताना म्हटलं की, “सगळं खोटं आहे. काहीच नवे उघड होत नसल्याने खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. आम्ही आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास ठेवतो.”
Rohini Khadse Slams Lawyer Over Vaishnavi Case Comments
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत वकिलांवर हल्लाबोल केला. “जो त्या वकिलाच्या चार कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करणार,” असं म्हणत त्यांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला.
हगवणे कुटुंबाच्या वकिलाने माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, “एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे हॅरेसमेंट ठरत नाही, ही मीडियाची ट्रायल आहे.” या विधानावरून खडसेंनी ( Rohini Khadse ) जोरदार निशाणा साधला.
याचवेळी कोर्टाने आरोपींच्या कोठडीत वाढ केली आहे. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माला एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात आली असून सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना 31 मेपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
📌 महत्वाच्या बातम्या
- “तो दोषी असेल तर फाशी द्या, पण आरोपी का करता?” हगवणेंच्या वकिलांचा निलेश चव्हाणबाबत स्फोटक युक्तिवाद!
- वैष्णवीचे ‘ते’ चॅटिंगचे व्हिडिओ व्हायरल केले असते, पण…! हगवणेंच्या वकिलांचा खळबळजनक दावा!
- 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी वैष्णवीला कशाला छळू? आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या!- वकिलांचा कोर्टात थरारक युक्तिवाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now