🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपला व्हायरल झालेला व्हिडिओ ‘मॉर्फ’ करून बनवला असल्याचा दावा करत, शिरसाट यांनी राऊत यांच्यावर वारंवार चारित्र्यहनन केल्याचा आरोप केला आहे. यासाठी संजय राऊत यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार असल्याचा इशारा शिरसाट यांनी दिला आहे. जर राऊत यांनी माफी मागितली नाही, तर त्यांच्याविरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Sanjay Shirsat send notice to Sanjay Raut
संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना आपला संताप व्यक्त केला. “राज्यघटना ते ( Sanjay Raut ) मानतच नाहीत आणि त्यांना त्याचं काही घेणं-देणं नाही. ते फुशारकीने सांगतील की अशा फार नोटीसा मी खिशात घालून फिरतो. मात्र मी कायद्याच्या चौकटीत राहून आज त्यांना नोटीस पाठवणार आहे,” असं शिरसाट म्हणाले.
राऊतांकडून या नोटीसीला कोणतंही उत्तर न आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. “मला असं वाटतंय की आता त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देणं गरजेचं आहे. कुठे-कुठे सरकारी बंगल्यात पार्ट्या केल्यात त्याचे व्हिडीओ मला सुद्धा दाखवावे लागतील. त्यांनी माझ्याविरोधात आणखी गरळ ओकण्याचा प्रयत्न केला तर त्याच भाषेत उत्तर देणार,” असा थेट इशारा शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांनी दिला आहे. यावरून येत्या काळात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अनाया बांगर म्हणाली, ‘लहानपणापासूनच मुलगी व्हायचं होतं, आईचे कपडे घालून..!
- जयंत पाटलांनी राजीनामा दिला! आता राष्ट्रवादीचा नवा ‘अध्यक्ष’ कोण? ‘या’ मोठ्या नावाची जोरदार चर्चा!
- लॉर्ड्स कसोटी रंगली… आणि पेटलीही! शेवटच्या षटकात मैदानावर Gill-Siraj आणि Crawley यांच्यात वाद









