🕒 1 min read
मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP-SP) गेल्या काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाच्या चर्चांना आता वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil resign ) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, लवकरच नवा चेहरा घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनुसार १५ जुलै रोजी नवीन प्रदेशाध्यक्षाची अधिकृत घोषणा होऊ शकते.
या पदासाठी विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे ( Shashi Kant Shinde ) यांचं नाव आघाडीवर असल्याचं सुत्रांकडून कळतंय. एकूण चार नावांचा विचार सुरु असून, अंतिम निर्णयावर वरिष्ठ नेतृत्व शिक्कामोर्तब करणार आहे.
Jayant Patil’s resignation as NCP-SP President
या सर्व घडामोडींवर आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मला प्रदेशाध्यक्षपद नको आहे. साध्या कार्यकर्त्यालाही संधी मिळायला हवी, आणि जयंत पाटील यांचं मार्गदर्शन कायम राहील,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
जयंत पाटील भाजपात प्रवेश करतील अशा चर्चांना पूर्णविराम देताना रोहित पवार म्हणाले, “जयंत पाटील पळून जाणाऱ्यांतले नाहीत. ते आजवर विचारांसोबत राहिले आहेत, सत्तेसाठी विचार सोडतील असं वाटत नाही.”
पक्षात गट-तट नसल्याचं सांगत रोहित पवार म्हणाले, “१५ जुलैला नवीन प्रदेशाध्यक्ष जाहीर होतील. निर्णय पवार साहेब, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील घेतील. मी स्वतः या शर्यतीत नाही.” त्यांनी ( Rohit Pawar ) स्पष्ट केलं की, “माझं लक्ष्य कुठलंही मोठं पद नाही. छोटं पद दिलं तरी मी जबाबदारीने ते निभावेल.”
यावेळी भाजपवर गंभीर आरोप करत रोहित पवार म्हणाले, “भाजप संस्था, कंपन्यांवर दबाव टाकून नेते पक्षात आणतोय. काँग्रेसचे माजी आमदार जगताप यांचा निर्णय त्यांचाच असेल, पण भाजपचं हे पॅटर्न स्पष्ट आहे.”
जयंत पाटील यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर, आता शरद पवार गटाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. १५ जुलै रोजी होणारी घोषणा पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी निर्णायक ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लॉर्ड्स कसोटी रंगली… आणि पेटलीही! शेवटच्या षटकात मैदानावर Gill-Siraj आणि Crawley यांच्यात वाद
- जयंत पाटील नेहमी माझ्या संपर्कात असतात, पक्षात खुश नाहीत; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान
- ‘जळालेल्या नोटा’ प्रकरणी माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरोधात संसदेत महाभियोगाची हालचाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








