Share

जयंत पाटील नेहमी माझ्या संपर्कात असतात, पक्षात खुश नाहीत; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान

BJP Minister claims Jayant Patil is in constant touch

Published On: 

Jayant Patil reaction on talk of joining other party

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) अंतर्गत वादावर आता भाजपमधूनही सूचक संकेत दिले जात आहेत. यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय, ते भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांच्या वक्तव्याने.

जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चा रंगात असताना, “जयंत पाटील माझ्या संपर्कात आहेत” असं विधान करत महाजनांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “त्यांना पक्षात फार समाधान वाटत नाही, पुढे काय होतंय ते बघू,” असंही ते म्हणाले.

Jayant Patil in Touch, Not Happy in NCP

महाजनांनी शरद पवार गटात ‘परिवार विरुद्ध कार्यकर्ते’ असा संघर्ष सुरू असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. “देशात अनेक पक्ष केवळ कुटुंबापुरतेच मर्यादित राहिले आहेत. मी माझी मुलगी, माझा पुतण्या, माझा जावई यापुढे पक्ष जातच नाहीये. देशात अनेक पक्ष आहेत की ते परिवाराशिवाय बाहेर पडत नाहीत. त्यामुळे त्यातले अनेक कार्यकर्ते बाहेर पडतील, अशी शक्यता आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

जयंत पाटील भाजपात येणार का, असा प्रश्न विचारला असता महाजन म्हणाले, “जयंतराव हे मोठे नेते आहेत. त्यांनी असं काही ठरवलं, तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीच बोलतील. आमच्यात या विषयावर अजून चर्चा झालेली नाही.”

एकनाथ खडसेंबाबत ( Eknath Khadse ) विचारले असता महाजनांनी मिश्किलपणे “कोण एकनाथ खडसे?” असा प्रतिप्रश्न करत थेट टोला लगावला. “नार पार प्रकल्पावर खडसेंनी चुकीचा मुद्दा मांडला. म्हातारपणामुळे बुद्धी कमजोर झाली, असंही ते स्वतःच म्हणाले होते,” असं म्हणत महाजनांनी ( Girish Mahajan ) पुन्हा एकदा त्यांच्यावर विनोदी पद्धतीने टीका केली.

संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओबाबत महाजन म्हणाले, “बॅग कपड्यांची असल्याचं शिरसाटांचं म्हणणं आहे. पण व्हिडिओ कोणी शूट केला, का केला, यावर संशय आहे.” तर रोहित पवारांच्या विरोधात दाखल झालेल्या पुरवणी आरोपपत्रावर ते म्हणाले, “जर त्यांनी काही चुकीचं केलं नसेल तर काही होणार नाही. केलं असेल तर ते चौकशीतून बाहेर पडणार नाहीत.”

महाजनांनी शेवटी असंही सूचित केलं की, “अनेक आमदार-खासदार संपर्कात आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे लगेच निर्णय होत नाही.” त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय हलचाली वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या