🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सध्या अंतर्गत घडामोडींनी खळबळ माजवली आहे. पक्षातील तीन बड्या नेत्यांच्या वादग्रस्त वागणुकीमुळे सत्ताधारी पक्षाची प्रतिमा डागाळल्याचं चित्र असताना, एकनाथ शिंदेंनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री शंभूराज देसाई या तिघांच्या वागणुकीमुळे विरोधकांनी सरकारवर टीका करण्याची संधी साधली आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षातली बेशिस्त आणि गोंधळाची वागणूक खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे.
Eknath Shinde Warns Sanjay Gaikwad, Shirsat
संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये जेवण खराब असल्याच्या रागातून कॅन्टीन मॅनेजरला मारहाण केली. “मला विष खायला घालतोस का?” असा सवाल करत मारहाण केली होती.
दरम्यान, मंत्री संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते बेडवर सिगारेट ओढताना दिसत असून, त्याच बेडखाली नोटांनी भरलेली बॅग असल्याचा दावा केला जातो. शिरसाट यांनी ती बॅग फक्त कपड्यांची असल्याचा दावा केला असला तरी, व्हिडिओमुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
तिसरे प्रकरण मंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांचं विधीमंडळात चर्चेदरम्यान त्यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्याशी वाद घालून कथित शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप झाला आहे.
या तिन्ही घटनांमुळे एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) प्रचंड नाराज असून, “पक्षाची प्रतिमा डागाळणारी वागणूक सहन केली जाणार नाही,” असा दम त्यांनी संबंधित नेत्यांना दिल्याचं समजतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदेंनी आपल्या नेत्यांना थेट सांगितलं आहे की, बेशिस्त वर्तनाचा पक्षाला राजकीय फटका बसतोय आणि अशी वागणूक आता खपवून घेतली जाणार नाही. या तिन्ही प्रकरणांमुळे शिंदे गटाच्या गोटात अंतर्गत अस्वस्थता वाढली आहे. विरोधकांनीही हे मुद्दे लावून धरत सरकारवर ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘म्हणून माझ्याविरोधात ईडीची कारवाई!’, आरोपपत्रानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
- रोहित पवारांच्या अडचणी वाढल्या: MSC बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल
- संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस; ‘व्हिट्स हॉटेल’ प्रकरणामुळे चौकशी की राजकीय दबाव?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










