🕒 1 min read
मुंबई : शिंदे गटातील नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने बजावलेली नोटीस सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीबाबत माहिती मागवण्यात आली आहे. शिरसाट यांनी नोटीस मिळाल्याची कबुली दिली असून, “चौकशीला सामोरे जाईन,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील ‘व्हिट्स हॉटेल’ लिलावातील कथित आर्थिक गैरव्यवहारामुळेच ही नोटीस आली असावी, अशी चर्चा आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी याच हॉटेल व्यवहारात ब्लॅक मनी वापरल्याचा आरोप करत, ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवसांतच शिरसाटांना ( Sanjay Shirsat ) नोटीस बजावली गेल्याने दोन्ही घटनांचा परस्परसंबंध जोडला जात आहे.
Sanjay Shirsat gets IT notice
“आयकर विभाग आपलं काम करत आहे. मी सहकार्य करणार असून कायदेशीर उत्तरही देईन,” असं म्हणत शिरसाट यांनी यामागे कोणतंही राजकारण नसल्याचं सांगितलं. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी ( Sanjay Shirsat ) मिश्कीलपणे “आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत” असे विधान केले होते, जे सध्या व्हायरल झाले आहे.
शिंदे गटावर दबाव वाढतोय का?
संजय शिरसाटांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनाही आयकर नोटीस मिळाल्याची चर्चा काही माध्यमांतून समोर आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचा रोख थेट शिंदे गटाच्या नेतृत्वाकडे वळल्याची राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बाहेर ये तुला दाखवतो!’ मंत्री शंभूराज देसाईंची आमदाराला धमकी; मराठीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत खडाजंगी
- संजय गायकवाड मारहाण प्रकरणात नवं वळण; कॅन्टिनचा परवाना रद्द, आमदार मात्र अजूनही मोकळे
- खडकवासला धरण परिसरातील अतिक्रमणाची मंत्र्यांकडून विधिमंडळात कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








