Share

‘बाहेर ये तुला दाखवतो!’ मंत्री शंभूराज देसाईंची आमदाराला धमकी; मराठीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत खडाजंगी

Minister Shambhuraj Desai threatened MLA during a heated debate on Marathi people’s housing in the Maharashtra Legislative Council.

Published On: 

Minister Shambhuraj Desai threatens MLA Anil Parab in Maharashtra Legislative Council.

🕒 1 min read

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. मुंबईत मराठी माणसाला घरे मिळण्याच्या मुद्द्यावरून आज विधान परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मराठी माणसासाठी काय केले, यावरून सुरू झालेल्या वादानं इतकं टोक गाठलं की, देसाई यांनी भर सभागृहात ‘बाहेर ये तुला दाखवतो’ अशी धमकीच दिल्याने एकच गोंधळ उडाला.

नेमकं काय घडलं सभागृहात?

आज विधान परिषदेत शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी मुंबईतील मराठी माणसाच्या घरांचा मुद्दा उपस्थित केला. “मुंबईत मराठी माणसाला घरं मिळाली पाहिजेत,” अशी मागणी करत, “मराठी माणसाला घरं नाकारणाऱ्या बिल्डरांविरोधात कारवाईसाठी सरकार कायदा करणार का?” असा थेट प्रश्न त्यांनी विचारला.

त्यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी परब यांच्यावर जोरदार पलटवार केला. देसाई म्हणाले, “तुमचं मराठी माणसावर प्रेम नाही. हे पुतनामावशीचं प्रेम आहे. तुम्ही काही केलं नाही, मराठी माणसासाठी काही करू शकला नाहीत. हे सगळं रेकॉर्डवर येतंय.” देसाईंच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी जोरदार गोंधळ सुरू केला.

Minister Shambhuraj Desai threatens MLA

‘गद्दार’ शब्दावरून पारा चढला, थेट धमकी!

गोंधळातही देसाई यांनी ( Shambhuraj Desai ) आपलं म्हणणं सुरू ठेवलं, “माझं उत्तर तरी ऐका. आम्ही काय करत होतो ते सांगू का?” यावर विरोधकांमधून कोणीतरी ‘तुमची गद्दारी सांगा’ असं म्हणताच, मंत्री देसाई यांचा पारा प्रचंड चढला. संतापलेल्या देसाईंनी थेट धमकीच्या सुरात विचारले, “काय गद्दारी सांगतो? गद्दार काय म्हणतो? गद्दार कोणाला म्हणतो? बाहेर ये तुला दाखवतो.  xxx गद्दार कोणाला म्हणतो रे?”

मंत्री देसाईंच्या या बेताल वक्तव्यामुळे सभागृहात तणावाचं वातावरण निर्माण झालं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी सभागृहाचं कामकाज १० मिनिटांसाठी थांबवत असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर, मंत्री देसाई यांनी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य रेकॉर्डमधून काढून टाकत असल्याची घोषणाही त्यांनी केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!