🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC बँक) गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आमदार रोहित पवारांनी अखेर मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे आणि विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांनी ट्विटरवर (X) एक पोस्ट शेअर केली. “कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणूनच माझ्यावर कारवाई झाली हे सर्वांना माहीत आहे. यापेक्षा जास्त काही सांगावं अशी गरज नाही,” असं सूचक विधान करत त्यांनी केलं.
Rohit Pawar Reacts to ED Chargesheet
याच पोस्टमध्ये त्यांनी ( Rohit Pawar ) पुढे म्हटलं, “ईडीचे अधिकारी केवळ आदेश पालन करत आहेत. आता आरोपपत्र दाखल झालं असून तपास पूर्ण झाला आहे. ज्याची वाट पाहत होतो, तो निर्णय आता न्यायालयाच्या हाती आहे. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, आणि यात ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ नक्कीच होईल.”
त्यांच्या भूमिकेचा रोख स्पष्ट करताना ते म्हणाले, “माझी लढाई विचारांसाठी आहे. महाराष्ट्राने कधीही लाचारी आणि फितुरीला थारा दिला नाही, संघर्षालाच डोक्यावर घेतलं. या भूमिकेपासून मी आजही हललो नाही.”
दरम्यान, MSC बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने पवारांविरोधात विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. बारामती ॲग्रो व इतर संबंधित कंपन्यांच्या संशयास्पद व्यवहारांमुळे ही कारवाई झाल्याचं ईडीने स्पष्ट केलं आहे. प्रकरणात ५० कोटींच्या कन्नड साखर कारखान्याची खरेदी, बोली प्रक्रियेतील कथित संगनमत, आणि आर्थिक लाभ घेण्याचा आरोप ईडीच्या तपासातून समोर आला होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित पवारांच्या अडचणी वाढल्या: MSC बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल
- संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस; ‘व्हिट्स हॉटेल’ प्रकरणामुळे चौकशी की राजकीय दबाव?
- ‘बाहेर ये तुला दाखवतो!’ मंत्री शंभूराज देसाईंची आमदाराला धमकी; मराठीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत खडाजंगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








