🕒 1 min read
लॉर्ड्स, इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर केवळ बॅट-बॉलची लढत नव्हे, तर शाब्दिक बाणांची फवाराही पाहायला मिळाली. भारताने पहिल्या डावात 387 धावांची मजबूत मजल मारल्यानंतर इंग्लंडने दिवसअखेर बिनबाद 2 धावांपर्यंत मजल मारली. मात्र, या धावसंख्येपेक्षा जास्त चर्चा झाली ती शेवटच्या षटकातील वादाची.
Lord’s Test: Shubman Gill, Siraj Clash with Crawley
दिवसाच्या अखेरीस, इंग्लंडचे सलामीवीर विशेषतः झॅक क्रॉउली वेळ काढत असल्याचे भारतीय खेळाडूंना जाणवले. वारंवार क्रीज सोडणं, खेळ थांबवणं — यामुळे मोहम्मद सिराज आणि शुभमन गिलचा ( Shubman Gill ) संयम सुटला. त्यांनी थेट मैदानावरच क्रॉउलीला झापलं. काही वेळ तर असं वाटत होतं की पंचांना मध्ये पडावं लागेल. शेवटचं षटक संपलं, पण हा वाद तसाच टिकून राहिला. मैदानावर वातावरण तापलेलं असतानाच दोन्ही संघ आपापल्या दिशेने परतले.
तिसऱ्या दिवशी भारताने 145/3 पासून खेळाला सुरुवात केली. केएल राहुलने संयमित आणि नेटकी खेळी करत आपलं शतक पूर्ण केलं. ऋषभ पंतच्या साथीनं त्यांनी 141 धावांची भागीदारी उभी केली. मात्र पंत 74 धावांवर धावबाद झाला आणि लगेचच राहुलही बाद झाला. तरीही भारताने मोठा स्कोअर उभारला.
जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी मधल्या फळीत 72 धावांची भागीदारी करत भारताला स्थैर्य दिलं. जडेजाने 72 धावा केल्या. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनेही महत्त्वपूर्ण योगदान दिलं. भारताच्या 6 विकेट्स 387 वर होईपर्यंत, एक मजबूत स्कोअर साकारला होता. पण पुढच्या 11 धावांत भारताने 4 विकेट्स गमावल्या. सुंदरने 23 धावांची खेळी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- जयंत पाटील नेहमी माझ्या संपर्कात असतात, पक्षात खुश नाहीत; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान
- ‘जळालेल्या नोटा’ प्रकरणी माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरोधात संसदेत महाभियोगाची हालचाल
- एकनाथ शिंदे आपल्याच शिलेदारांमुळे चक्रव्यूहात? मंत्र्यांना कडक दम!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








