Share

शुभमन गिलची मोठी चूक अन् गुजरातचा पराभव; आरसीबीची थेट फायनलमध्ये धडक! शुबमन गिल म्हणाला…..

आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवत थेट फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने मोठी प्रतिक्रिया दिली.

Published On: 

RCB captain Rajat Patidar and GT captain Shubman Gill at IPL 2026 Final Toss

सलग दुसऱ्यांदा फायनल खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या गुजरात टायटन्सला आरसीबीने (IPL 2026) असा काही धोबीपछाड दिलाय की चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. नाणेफेक जिंकूनही गुजरातच्या हाती अशी निराशा का आली?

आयपीएल २०२६ च्या पहिल्याच क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) गुजरातचा दारुण पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात तब्बल २५४ धावांचा डोंगर उभा केला. मागील वर्षी आयपीएलची ट्रॉफी उचलणाऱ्या आरसीबीने यंदाही तोच दबदबा कायम ठेवत थेट फायनलचं तिकीट कन्फर्म केलं आहे.

IPL 2026 GT vs RCB

२५५ धावांचं महाकाय टार्गेट गाठताना गुजरातची सुरुवातच खूप खराब झाली. खुद्द कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आणि साई सुदर्शन स्वस्तात माघारी परतले. पाठोपाठ जोस बटलरचीही विकेट पडली आणि तिथेच अर्धा सामना आरसीबीच्या खिशात गेला. पॉवरप्लेमध्ये बसलेल्या या धक्क्यातून गुजरातचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही.

या दारुण पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने थेट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “१२-१३ व्या षटकापर्यंत सगळं ठीक होतं, पण आमचं क्षेत्ररक्षण खूपच सुमार झालं,” अशी स्पष्ट कबुली त्याने दिली.

सामन्यानंतर बोलताना गिलने पराभवाचं खापर खराब फिल्डिंगवर फोडलं. “सराव सत्रात आम्ही फिल्डिंगवर मेहनत घेतो, पण दबावाखाली आम्ही कमी पडलो. हातात आलेले सोपे झेल सुटले. एवढं मोठं टार्गेट असताना आणि मैदानाची बाहेरील बाजू वेगवान असताना पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात मिळणं गरजेचं होतं,” असं गिलने स्पष्ट केलं.

आता आरसीबी फायनलमध्ये पोहोचली असली तरी, गुजरातचं आव्हान अजून संपलेलं नाही. २९ मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर २ मध्ये त्यांना आणखी एक संधी मिळणार आहे.

एलिमिनेटरमध्ये भिडणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील विजेत्याशी गुजरातची गाठ पडेल. त्यामुळे आता अंतिम फेरीत आरसीबीशी कोण भिडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install