अनाया बांगर म्हणाली, ‘लहानपणापासूनच मुलगी व्हायचं होतं, आईचे कपडे घालून..!

Sanjay Bangar’s daughter, Anaya Bangar, reveals childhood desire to be a girl in viral video.

Published On: 

Anaya Bangar, Sanjay Bangar's daughter, shares her journey of gender affirmation, revealing she always wanted to be a girl since childhood.

मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर ( Sanjay Bangar ) यांची मुलगी अनाया बांगर (पूर्वी आर्यन बांगर) सध्या तिच्या जेंडर बदलाच्या प्रवासामुळे चर्चेत आहे. अनायाने ( Anaya Bangar ) अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या आयुष्यातील काही खास आणि व्यक्तिगत टप्प्यांवर मोकळेपणाने प्रकाश टाकला आहे.

या व्हिडिओमध्ये अनायाने सांगितलं की, “मी लहानपणापासूनच मुलगी होण्याचं स्वप्न पाहत होते. मी 9 वर्षांची असताना आईचे कपडे चोरून आरशासमोर घालायचे. मला स्वतःला मुलगी म्हणून पाहणं खूप आवडायचं.”

Anaya Bangar shares gender journey

या प्रवासात तिला सर्वाधिक आधार मिळाला तो तिच्या लहान भावाकडून. अनायाने सांगितलं, “माझा भाऊ अथर्व फक्त १६ वर्षांचा आहे, पण त्याने मला असं म्हटलं, तू जेंडर बदल केलास तरी तू माझी बहीणच राहशील. ही भावना माझ्यासाठी खूप मोठी होती.”

क्रिकेट वातावरणात वाढलेल्या अनायानेही आपल्या करिअरची सुरुवात क्रिकेटमधूनच केली होती. ती मुंबईच्या अंडर-16 संघात खेळली असून, लँकेशायरमधील स्थानिक क्लबसाठीही क्रिकेट खेळली आहे. यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, मुशीर खान यांच्यासोबतही तिने मैदानात बॅट फिरवली होती. मात्र, आता ती ( Anaya Bangar ) क्रिकेटपासून दूर गेली आहे.

अनायाने तिच्या जेंडर ट्रांझिशनच्या प्रवासावर आधारित एक डॉक्युमेंटरी तयार केली असून, ती लवकरच तिच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणार आहे. या माहितीपटात तिने केवळ शस्त्रक्रिया आणि बदलांची प्रक्रिया नव्हे, तर स्वतःला शोधण्याचा, समजून घेण्याचा आणि स्वीकारण्याचा संपूर्ण प्रवास मांडला आहे. अनायाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकांनी तिच्या ( Anaya Bangar ) धाडसाचं कौतुक केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही