Share

“तो दोषी असेल तर फाशी द्या, पण आरोपी का करता?” हगवणेंच्या वकिलांचा निलेश चव्हाणबाबत स्फोटक युक्तिवाद!

Nilesh Chavan took care of the baby, not harassed – shocking claim by Hagawane’s lawyer in Vaishnavi case.

Published On: 

Vaishnavi Hagavane Case: Nilesh Chavhan Threatens Family - Nilesh Chavan

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणबाबत ( Nilesh Chavan ) खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. न्यायालयात आज झालेल्या सुनावणीदरम्यान, राजेंद्र हगवणे यांच्या वकिलांनी निलेश चव्हाणला या प्रकरणात सहआरोपी करणे चुकीचं असल्याचा ठाम युक्तिवाद केला. उलट, निलेशने बाळाची काळजी घेतली होती, असा दावा वकील विपुल दुषिंग यांनी कोर्टात केला.

हगवणे कुटुंबाच्या बाजूने युक्तिवाद करताना वकिल म्हणाले, “निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही. जर तो दोषी असेल, तर त्याला फाशी द्या. पण त्याला या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गुंतवलं जात आहे.”

Nilesh Chavan took care of the baby, not harassed

निलेश चव्हाणविरोधात पत्नीने गंभीर आरोप केलेले आहेत. 2022 मध्ये निलेशने पत्नीचे स्पाय कॅमेऱ्याने आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याचा गुन्हा दाखल आहे. वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणातही त्याच्यावर बाळाची हेळसांड आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. तो सध्या फरार असून, त्याच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे पोलिसांनी एकूण सात पथकं राज्यभर आणि बाहेर पाठवली आहेत.

फरार निलेश चव्हाणविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्याच्या लॅपटॉपमध्ये पत्नीबरोबरच इतर अनोळखी महिलांचेही आक्षेपार्ह व्हिडीओ सापडल्याची माहिती आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही