🕒 1 min read
पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणातील ( Vaishnavi Hagawane case ) अटक आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. या वेळी पोलिसांनी पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत आरोपींना पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता, आणि नणंद करिश्मा यांना १ दिवस, तर सासरे राजेंद्र आणि नातेवाईक सुशील हगवणे यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
Vaishnavi Hagawane suicide case
फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणात फरार आरोपी निलेश चव्हाण कुठे आहे, हे शोधणे आवश्यक आहे. तसेच वैष्णवीच्या मोबाईलमधील व्हिडीओ क्लिप्स, मारहाणीत वापरलेली हत्यारे आणि रॉड, तसेच हुंड्यातील ५१ तोळ्यांचं सोने याबाबतची माहिती गोळा करण्यासाठी पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले.
दुसरीकडे, हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करत वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिचे काही “चॅट” दाखवले. त्यांनी दावा केला की वैष्णवीने यापूर्वीही आत्महत्येचे अनेक प्रयत्न केले होते. एकदा रॅट पॉइझन, तर दुसऱ्यावेळी गाडीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला होता. या युक्तिवादात त्यांनी म्हटले की, “चार कानाखाली मारणे म्हणजे छळ नाही!”
निलेश चव्हाणला या प्रकरणात अडकवणे चुकीचे असल्याचा युक्तिवाद करत, त्याने बाळाची काळजी घेतली होती, असंही वकिलांनी सांगितलं. तसेच, “आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत, 40 लाखाच्या फॉर्च्यूनरसाठी छळ करू का?” असा सवाल करत पोलिस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. कोर्टाने मात्र हा युक्तिवाद फेटाळून लावला आणि पोलिस कोठडीत वाढ केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “मविआ खड्ड्यात गेली!” उद्धव ठाकरे गटाचे बंड; राहुल गांधींना काळं फासण्याचा इशारा!
- लग्नात पिस्तूल बाहेर, शिवतारेंच्या नात्यातील भांडणातून थरारक प्रसंग, पाहुण्यांपुढेच धमकी!
- “पैसे कुठून आले? शिंदे-शाहांनी दिले का?” शिरसाटांच्या ६७ कोटींच्या प्रॉपर्टीवर राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











