🕒 1 min read
पुणे – पुण्यातील सासवड भागात एका लग्न सोहळ्यात राजकारण आणि कुटुंबातील वैयक्तिक वाद यांचा विस्फोट झाला. आमदार विजय शिवतारेंचे चुलत मेव्हणे आणि शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख दिलीप यादव यांनी आपल्या पुतण्या आणि पुतणीवर पिस्तूल रोखल्याचा गंभीर आरोप केला गेला आहे.
ही घटना सासवड-हडपसर रोडवरील महाराजा लॉन्स येथे एका लग्नसमारंभात घडली. केतकी झेंडे आणि प्रसाद यादव हे शिवतारेंचे भाचा-भाची असून, त्यांच्यावर दिलीप यादव आणि त्यांच्या मुलगा विनय यादव यांनी बंदुकीचा धाक दाखवला.
Vijay Shivtare’s Relatives Face Gun Threat by Family Member
या प्रकरणी केतकी झेंडे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, दुसरीकडे विनय यादव यांनी देखील आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप करत प्रतिफिर्याद दाखल केली आहे.
केतकी झेंडे व प्रसाद यादव यांनी सांगितले की, “हे वाद नवीन नाहीत. दिलीप यादव यांनी आधीही आमच्यावर अन्याय केला. आता तर बंदूक रोखून धमकी दिली.” या सगळ्या प्रकारामुळे विजय शिवतारे यांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्ष सार्वजनिकपणे चव्हाट्यावर आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “पैसे कुठून आले? शिंदे-शाहांनी दिले का?” शिरसाटांच्या ६७ कोटींच्या प्रॉपर्टीवर राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
- “तक्रार करू नका, अजित पवारांच्या मागे लागा!” पवारांविरोधात तक्रार करणाऱ्या भाजप आमदारांना अमित शाह यांचा कानमंत्र!
- वयाचं भान ठेवा, टोपाचे केसही पिकलेत! राऊतांचा राणेंना झणझणीत टोला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








