Share

वर्षा उसगांवकरांनी सांगितला बाळासाहेबांचा ‘तो’ खाजगी किस्सा; आईसमोरच म्हणाले, “मी बिअर पितो पण…”

Actress Varsha Usgaonkar shares a candid memory of Balasaheb Thackeray, revealing a funny conversation about beer and his playful nature.

Published On: 

Actress Varsha Usgaonkar shares a candid memory of Balasaheb Thackeray, revealing a funny conversation about beer and his playful nature.

मुंबई – शेजारी कोण राहतो यावर तुमचं सुख आणि सुरक्षितता अवलंबून असते, असं म्हणतात. पण जर तुमचा शेजारी खुद्द ‘हिंदूहृदयसम्राट’ असेल तर? मराठमोळी अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांच्याबाबतीत हा योग जुळून आला होता. रुपेरी पडदा आणि ‘बिग बॉस’चं घर गाजवणाऱ्या वर्षा यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा एक असा किस्सा सांगितला आहे, जो ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

“गोव्याची मुलगी कसं काय आलीस?”

वर्षा उसगांवकर यांचं घर आणि ठाकरेंचं ‘मातोश्री’ (Matoshree) अगदी खेटून! त्यामुळे कलानगरमध्ये राहताना त्यांना कधीच भीती वाटली नाही. वर्षा उसगांवकर सांगतात, “बाळासाहेबांमुळे आम्हाला २४ तास पोलीस संरक्षण मिळायचं. रात्रीचे दोन-चार वाजता जरी घरी आले तरी सुरक्षित वाटायचं.” बाळासाहेबांचा स्वभाव अत्यंत खेळकर होता. ते वर्षा यांना नेहमी गमतीने विचारायचे, “काय गं… गोव्याची मुलगी इथं दामूकडे कशी काय राहतेस?”

Varsha Usgaonkar shares a candid memory of Balasaheb Thackeray

एकदा वर्षा आपल्या आईला घेऊन बाळासाहेबांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यावेळी बाळासाहेबांच्या मूळ स्वभावाचा परिचय त्यांना आला. गप्पांच्या ओघात बाळासाहेब थेट म्हणाले, “मी बिअर पितो… दुपारी पण पितो. पण ही कॅलरीशिवाय (Calories Free) असलेली बिअर आहे.” हे ऐकून वर्षा आणि त्यांची आई अवाकच झाल्या. एवढ्या मोठ्या नेत्याचा हा बिनधास्त आणि गमतीशीर अंदाज पाहून त्या भारावून गेल्या होत्या. इतकंच नाही, तर बाळासाहेब गप्पा मारता मारता अचानक मिथुन चक्रवर्ती किंवा इतर स्टार्सना फोन लावायचे आणि आमचं बोलणं करून द्यायचे, अशी आठवणही वर्षा यांनी सांगितली.

वैयक्तिक आयुष्यातील वादळं

एकीकडे बाळासाहेबांसारखा दिलदार शेजारी, तर दुसरीकडे सासरच्या संपत्तीचा वाद. वर्षा उसगांवकर यांचे सासरे आणि प्रसिद्ध संगीतकार रवी शंकर शर्मा यांनी वर्षा आणि त्यांच्या पतीला संपत्तीतून बेदखल केले होते. हे प्रकरण बरीच वर्षे गाजले. पण या चढ-उतारातही बाळासाहेबांच्या आठवणी आणि त्यांचा सहवास वर्षा उसगांवकर यांच्यासाठी खास ठरला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही