🕒 1 min read
मुंबई – महाराष्ट्रात महायुती सरकार कार्यरत असलं तरी भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात अंतर्गत तणाव जाणवू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नांदेड दौऱ्यात भाजपच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात थेट तक्रार मांडली.
या आमदारांनी अजितदादांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांच्याकडून होत असलेल्या कुरघोड्यांचा उल्लेख केला. मात्र या तक्रारींवर अमित शाह यांनी फारसं बावरत न बसता भाजप आमदारांनाच “कानमंत्र” दिला.
Amit Shah Tells BJP MLAs to Stay Strong Amid Complaints Against Ajit Pawar
“तुमची संख्या जास्त आहे. तुम्ही मागे हटू नका. कामासाठी सगळ्या मंत्र्यांच्या मागे लागा. तक्रार घेऊन अजित पवार माझ्याकडे यायला हवेत!” असं म्हणत शाहांनी भाजप आमदारांना अजित पवारांच्या मागे लागण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते.
या भेटीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, पक्षांतर्गत समन्वय आणि युतीतील कार्यपद्धतीबाबत सखोल चर्चा झाली.
📌 महत्वाच्या बातम्या
- वयाचं भान ठेवा, टोपाचे केसही पिकलेत! राऊतांचा राणेंना झणझणीत टोला!
- ‘नोटीस दिली असती तरी झालं असतं!’ – कोर्टाने पोलिसांना सुनावलं, हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट
- Bigg Boss OTT 4 ऑगस्टमध्ये रंगणार; या ट्विस्टमुळे तयार होणार Bigg Boss 19 ची जबरदस्त तयारी!