Anil Deshmukh : १०० कोटी रुपयांची कथित खंडणी आणि मनी लाँड्रिंग (money laundering) प्रकरणात, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट’ (PMLA) अंतर्गत खटला चालवण्यास मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी या खटल्यासाठी आवश्यक ती परवानगी दिली आहे.
मुंबईतील विशेष PMLA न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, ईडीचे (ED) विशेष सरकारी वकील सुनील गोन्सालव्हस यांनी न्यायालयाला सांगितले की, राज्यपालांनी आवश्यक मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे आता आरोप निश्चितीचा (framing of charges) आणि खटल्याच्या औपचारिक कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे. २०२१ मध्ये, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांच्यावर अधिकारांचा गैरवापर केल्याचे आरोप झाले होते. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते.
Anil Deshmukh PMLA case ED court approval Maharashtra
परमबीर सिंग यांनी असा दावा केला होता की, गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि इतर अधिकाऱ्यांना मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट्सकडून दरमहा १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे निर्देश दिले होते. या घटनेमुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि आता त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खटला चालवण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली असली तरी, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान ‘अँटिलिया’च्या बाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणातील तपास आणि आरोप निश्चितीबाबत ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’च्या (NIA) भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एटीएस (ATS) काय म्हणाले?
‘अँटिलिया’च्या बाहेर स्फोटके ठेवण्याच्या संपूर्ण कटाचा सूत्रधार हा तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंगच होता, असे ‘अँटी-टेररिझम स्क्वॉड’ने (ATS) आपल्या तपासात स्पष्टपणे नमूद केले होते. त्याचप्रमाणे, उच्च न्यायालयानेही परमबीर सिंग यांनाच या संपूर्ण कटाचा सूत्रधार मानले आहे. अनिल देशमुख यांनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे की, मग सर्वात मोठा प्रश्न हा आहे की NIA परमबीर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न का करत आहे? त्यांनी हा मुद्दाही मांडला.
📌 महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde यांची नाराजी चर्चेत; शिवसेनेतील चार मंत्र्यांची खाती बदलणार?
- वयाच्या 74 व्या वर्षी प्रदीप रावत यांचे निधन; ‘महाभारत’पासून ‘गजनी’पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
- राज्यात SIR ला मुदतवाढ; मतदार नोंदणी आता १७ ऑगस्टपर्यंत, प्रारूप यादी २४ ऑगस्टला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












