Share

‘नोटीस दिली असती तरी झालं असतं!’ – कोर्टाने पोलिसांना सुनावलं, हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट

Court slams Bavdhan Police in Vaishnavi Hagvane case; says arrest not needed, notice was enough.

Published On: 

"Don't you regret what happened?" asked a journalist. Shockingly, Rajendra Hagawane arrogantly dismissed the question, showing no remorse after being arrested in Vaishnavi Hagvane suicide case. - Vaishnavi Hagawane

🕒 1 min read

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात ( Vaishnavi Hagvane case ) मोठी घडामोड घडली आहे. हगवणे बंधूंना मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, यासंदर्भात न्यायालयाने बावधन पोलिसांना चांगलेच सुनावले आहे.

कोर्टाने स्पष्ट विचारणा केली  “तुम्ही आरोपींना नोटीस देऊ शकला असता, मग अटक का केली?” न्यायालयाने ही अटक अनावश्यक असल्याचे सांगत पोलिसांचे कार्यप्रणालीवरच प्रश्न उपस्थित केला आहे.

Vaishnavi Hagvane Case Update Pune

राजेंद्र आणि सुशील हगवणे हे फरार असताना पाच जणांनी त्यांना मदत केल्याचा आरोप आहे. त्याच अनुषंगाने बावधन पोलिसांनी त्यांना अटक केली होती. परंतु न्यायालयाने याला जामिनपात्र गुन्हा मानत सर्वांना जामीन मंजूर केला. दरम्यान, न्यायालयाच्या टिप्पणीमुळे पोलिस दलाची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हगवणे बंधूंच्या पिस्तुल परवान्याबाबत देखील पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. भाडेकराराच्या आधारे पुण्यातील पत्ता दाखवून त्यांनी पुणे आयुक्तालयाच्या हद्दीतून परवाना घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे कायदेशीर आहे का? यावर आता प्रश्न उपस्थित झाले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Pune Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या