Share

‘माझं डोकं बेसिनमध्ये घालून मला मारलं’ — सुयश चोंधेंच्या पत्नीचा गंभीर आरोप

Wife of Suyash Chondhe claims he assaulted her by pushing her head in a washbasin. FIR filed. Accused also helped Hagawane family escape.

Published On: 

Suyash Chondhe’s wife accuses him of brutal abuse; says he hit her with her head in washbasin. FIR filed in Khadki Police Station.

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. हगवणे कुटुंबाला पळून जाण्यास मदत करणाऱ्या सुयश चोंधे ( Suyash Chondhe ) याच्या पत्नीने भीषण छळाचे आरोप केले आहेत. धनश्री चोंधे यांनी पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात म्हटलं आहे की, “माझं डोकं बेसिनमध्ये घालून नवऱ्याने मला मारहाण केली.”

धनश्री चोंधेंनी खडक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, नवऱ्याच्या शिवाय सासू-सासऱ्यांनी आणि दीरांनीही सतत मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. लग्नानंतर हुंड्यासाठी छळ सुरू झाला होता. या छळाचा कळस म्हणजे, तिला घरात मारहाण केली जाऊ लागली आणि धमकावलंही गेलं.

Suyash Chondhe’s wife accuses him of brutal abuse

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे आरोपी पळून जात असताना, सुयश आणि संतोष चोंधे यांनी त्यांना ‘थार’ गाडी पुरवली, असा पोलिसांचा आरोप आहे. केवळ एवढंच नव्हे, तर या दोघांनी क्रेटा गाडीवर बेकायदेशीर लाल दिवा लावून मुळशी परिसरात वावर केला. लाल दिव्याचा गैरवापर हा कायद्याचा उल्लंघनच आहे.

पीडित सूनेने जानेवारी २०२५ मध्ये खडक पोलीस ठाण्यात तक्रार केली होती आणि फेब्रुवारीमध्ये राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली होती. मात्र, महिला आयोगाने कोणतीही कारवाई न करता तक्रारीकडे दुर्लक्ष केलं, असा सूनेने आरोप केला आहे. या प्रकरणात दुर्लक्ष केल्याने रुपाली चाकणकर यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुन्हा राज्य महिला आयोगाने ( Rupali Chakankar ) या प्रकरणातही निष्क्रियता दाखवल्याचं समोर आलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही