Share

आणखी एक विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न, ‘हगवणे कनेक्शन’ पुन्हा चर्चेत

After Vaishnavi Hagwane’s suicide, another woman attempts suicide over dowry torture. Hagwane family’s name resurfaces in shocking twist.

Published On: 

Vaishnavi Hagwane Case: Another Woman Attempts Suicide, Shocking Hagwane Connection Exposed

🕒 1 min read

पुणे | 27 मे 2025 — वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या घटनेने महाराष्ट्र हादरल्यानंतर, अजून एक गंभीर प्रकार समोर आला आहे. पुण्यातील आणखी एका विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, या प्रकरणातही राजेंद्र हगवणे याचे कनेक्शन समोर आले आहे.

आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पीडित महिलेनं आपल्या पती सुयश चौंधे, दीर संकेत चौंधे, सासरा नरेश चौंधे आणि सासू वैशाली चौंधे यांच्या विरोधात पाच महिने आधी खडक पोलीस स्टेशनमध्ये आणि नंतर महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, अजून कोणतीच ठोस कारवाई झाली नसल्याचं तिचं म्हणणं आहे.

Vaishnavi Hagwane Pune suicide case

पीडितेच्या आरोपानुसार, सासू काळी जादू करते, लग्नात दोन लाख रुपये आणि दोन तोळे सोनं दिल्यानंतरही चौंधे कुटुंबाकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. त्यासाठी तिला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत होता. वीस लाख रुपयांच्या मागणीसाठी तिचा प्रचंड छळ करण्यात आला.

या प्रकरणात विशेष लक्षवेधी बाब म्हणजे, वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा यांचा संबंध देखील याच चौंधे कुटुंबाशी जोडला गेला आहे. पीडितेचा दीर संकेत चौंधे याच्या मालकीची थार गाडी, हगवणे पितापुत्र वापरत असल्याची माहिती समोर आली आहे.

बावधन पोलिस ठाण्यात संकेत चौंधेला चौकशीसाठी आणण्यात आलं असताना, पोलिस ठाण्यासमोर २०-२५ जणांची गर्दी जमली होती. त्याचवेळी सुयश चौंधेची पत्नी पोलीस ठाण्यात पोहचून आपल्या सासरच्या लोकांविरोधात पुन्हा तक्रार दाखल करत असल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रकरण केवळ वैयक्तिक नसून सामाजिकदृष्ट्या गंभीर स्वरूपाचं असून, संबंधित यंत्रणांनी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Crime Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या