🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर | शहरात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तब्बल 41 लाखांची लाच मागणाऱ्या निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर याला अटक केली आहे. शेतजमिनीच्या वर्गवारीसाठी त्याने एका तक्रारदाराकडे ही रक्कम मागितली होती. यापैकी 23 लाख रुपये आधीच घेतले होते, आणि उरलेल्या 18 लाखांपैकी 5 लाख घेताना ते एसीबीच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईदरम्यान खिरोळकर यांच्या घरी छापा टाकण्यात आला, आणि तेव्हा तब्बल 67 लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यामध्ये 13.06 लाखांची रोकड, 59 तोळे सोनं (किंमत अंदाजे 51 लाख), आणि 3.5 किलो चांदी (किंमत 3.39 लाख) समाविष्ट आहे. ही मोठी संपत्ती पाहता, खिरोळकर यांच्या मालमत्तेची चौकशी होण्याची शक्यता आहे.
ACB Raids Maharashtra Officer’s House
या धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे आणि भ्रष्टाचारविरोधी यंत्रणांवर जनतेचा विश्वास पुन्हा जागवला जात आहे.
नेमकं काय-काय सापडलं?
1) रोख रक्कम-13,06,380/-
2) सोन्याचे दागिने – 589 ग्रॅम किंमत अंदाजे, 50,99,583/-
3) चांदीचे दागिने- 3 किलो 553 ग्रॅम किंमत 3,39,345/-
मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम अशी एकूण किंमत- 67,45,308/- रुपये मिळून आले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबई तुंबली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारलं एकनाथ कुठे आहे? : संजय राऊत
- “घरात न्याय नाही, मग समाजाला काय?” अंजली दमानियांचा संजय शिरसाटांवर घणाघात
- “मोदी, शाह, फडणवीस यांची नावे घेतलीस तर याद राख!” नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





