Share

“घरात न्याय नाही, मग समाजाला काय?” अंजली दमानियांचा संजय शिरसाटांवर घणाघात

Anjali Damania slams Minister Sanjay Shirsat for ignoring serious allegations against his son. “No justice at home, then how will he deliver justice to society?”

Published On: 

Anjali Damania slams Minister Sanjay Shirsat for ignoring serious allegations against his son. “No justice at home, then how will he deliver justice to society?”

🕒 1 min read

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर गंभीर आरोप असतानाही ते “हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे” असं म्हणणं म्हणजे जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न असल्याचं मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केलं आहे.

“जे स्वतःच्या घरात अन्याय रोखू शकत नाहीत, ते राज्यातील जनतेला काय न्याय देतील?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पीडित महिलेच्या वकिलामार्फत दिलेली नोटीस मागे घेतल्याचा मुद्दा हायलाइट करत दमानिया म्हणाल्या, “हे प्रकरण दाबण्याचा सरळ प्रयत्न आहे.”

Anjali Damania Slams Minister Sanjay Shirsat

त्याचबरोबर, पीडित महिलेला आत्महत्येची धमकी देत लग्नासाठी जबरदस्ती करण्यात आली, नंतर गर्भपातही करायला लावल्याचा दावा त्यांनी केला. यानंतरही मंत्रिपुत्राने तिला “माझे वडील मंत्री होणार आहेत, शिंदे यांचे उजवे हात आहेत” अशा धमक्या दिल्या आणि वाऱ्यावर सोडल्याचे आरोप आहेत.

“सामाजिक न्याय मंत्र्याचा हा न्याय आहे का? ते या पदासाठी लायक नाहीत,” असा रोष त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!