Share

संजय शिरसाट यांचे पुत्र निर्दोष? महिलेने घेतला यु-टर्न, मोठा खुलासा!

Woman withdraws all allegations against Siddhant Shirsat, calls it a personal matter, says “I give it a full stop”.

Published On: 

Maharashtra minister Sanjay Shirsat’s son Siddhant Shirsat faces legal notice from a woman claiming to be his wife, alleging mental and physical abuse.

छत्रपती संभाजीनगर- पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट ( Siddhant Shirsat ) यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. ज्याच्यावर मानसिक, शारीरिक छळ, फसवणूक आणि धमकीचे आरोप झाले होते, त्या सिद्धांत शिरसाट प्रकरणातील महिलेने अचानक आरोप मागे घेतले आहेत.

“हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे, यावर कुणीही राजकारण करू नये,” असं स्पष्ट करत या विवाहित महिलेने माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली. “मी संजय शिरसाटांचा सन्मान करते. त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही. सिद्धांतवर केलेले सर्व आरोप मी मागे घेते,” असं ती म्हणाली.

Siddhant Shirsat accused by a woman

महिलेनं हे देखील स्पष्ट केलं की, हे संपूर्ण प्रकरण तिच्या खासगी आयुष्यातील आहे आणि “या प्रकरणावर मी फुलस्टॉप देते”. सोशल मीडियावर किंवा तिच्या नावाने कुणीही राजकारण केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही तिने दिला.

या प्रकरणात 2022 मध्ये बौद्ध पद्धतीने लग्न झाल्याचा दावा, जबरदस्तीचा गर्भपात, आणि संबंधातील फसवणुकीचे आरोप करण्यात आले होते. परंतु आता महिलेने या सर्व आरोपांना पूर्णविराम दिल्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही