🕒 1 min read
Suresh Raina | महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघ या वर्षीच्या IPL मध्ये प्लेऑफपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरला. मात्र, तरीही सीझनचा शेवट त्यांनी शानदार विजयासह केला. गुजरात टायटन्स विरुद्ध शेवटच्या सामन्यात चेन्नईने 230 धावांचा डोंगर उभा केला आणि गुजरातला केवळ 147 धावांमध्ये गुंडाळत 83 धावांनी विजय मिळवला.
या विजयानंतर चेन्नईच्या खराब कामगिरीवर प्रतिक्रिया देताना माजी खेळाडू सुरेश रैनाने पुढील सीझनसंदर्भात मोठा इशारा दिला आहे.
Suresh Raina Return as CSK Batting Coach in IPL 2026
गुजरात आणि चेन्नई सामन्यादरम्यान कमेंट्री करताना ‘चिन्ना थाला’ म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना म्हणाला की, “चेन्नई सुपर किंग्जला पुढच्या सीझनसाठी म्हणजेच IPL 2026 साठी नवीन फलंदाजी प्रशिक्षक मिळणार आहे.”
हे ऐकून कमेंटेटर आकाश चोप्रा म्हणाले, “त्याचं नाव ‘S’ ने सुरू होतं…” त्यानंतर ते म्हणाले, “चला आता स्पष्टच बोलूया.” मात्र हे ऐकताच रैना फक्त हसून राहिला. यावरून चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे की, रैना CSK मध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून परतणार आहे.
माईक हसी सध्या CSK चे फलंदाजी प्रशिक्षक
सध्या CSK संघात ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसी 2018 पासून फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. जर रैना प्रशिक्षक म्हणून आला, तर तो हसीची जागा घेऊ शकतो, अशी शक्यता आहे.
रैनाचा IPL कारकिर्दीचा आढावा
• IPL मध्ये 205 सामने खेळले.
• 200 डावांमध्ये 32.51 च्या सरासरीने 5528 धावा.
• 1 शतक आणि 39 अर्धशतकं.
• 2014 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध 16 चेंडूत अर्धशतक, जे IPL इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद अर्धशतक आहे.
• CSK साठी सर्वात जलद अर्धशतक करणारा पहिला खेळाडू.
📌 महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात पावसाचा कहर; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस पुन्हा झोडपणार
- “प्रेग्नंसीची कल्पनाही नव्हती, अन् डान्स केला”; सोनाली बेंद्रेचा अनपेक्षित खुलासा
- PBKS vs MI : “हा फक्त झटका होता”; पराभवानंतर हार्दिक पंड्याचा खेळाडूंना स्पष्ट संदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now