Share

“18 वर्षांपूर्वीचं स्वप्न अखेर पूर्ण! RCB चं विजेतेपद पाहून विजय मल्ल्या भावुक”

Vijay Mallya says RCB winning IPL 2025 is a dream come true. “Trophy belongs to Bengaluru fans,” he adds emotionally.

Published On: 

Vijay Mallya says RCB winning IPL 2025 is a dream come true. “Trophy belongs to Bengaluru fans,” he adds emotionally.

IPL 2025 चं विजेतेपद जिंकून इतिहास रचलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या ऐतिहासिक क्षणावर, या फ्रँचायझीचे माजी मालक विजय मल्ल्या ( Vijay Mallya ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“RCB ची स्थापना करताना माझं एकच स्वप्न होतं की, ”आयपीएल ट्रॉफी बेंगळुरुला यावी,” असं मल्ल्यानी म्हटलं. त्यांनी पुढे सांगितलं की, “किंग कोहलीला तरुण वयात संघात घेतलं, युनिव्हर्स बॉस क्रिस गेल आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्ससारख्या महान खेळाडूंना संघात घेण्याचा सन्मान मिळाला. जे RCB च्या इतिहासाचा अविभाज्य भाग राहिले आहेत.”

Vijay Mallya Emotional After RCB Wins IPL 2025

मल्ल्यांनी RCB च्या चाहत्यांचीही विशेष प्रशंसा केली. “RCB चे चाहते हे खऱ्या अर्थानं सर्वोत्तम आहेत आणि ही ट्रॉफी त्यांच्यासाठीच होती,” असं त्यांनी नमूद केलं.

RCB ने रजत पाटीदारच्या नेतृत्वात IPL 2025 ट्रॉफी जिंकून 18 वर्षांची प्रतीक्षा संपवली. याआधी अनेक दिग्गज खेळाडूंनी संघाचं नेतृत्व केलं, पण ट्रॉफी जिंकता आली नव्हती. अखेर यंदा संघाने सर्वोत्तम कामगिरी करत पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही