प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: भारताचा माजी लेगस्पिनर अमित मिश्रा याने भारतीय संघात आपले पुनरागमन का होऊ शकले नाही, याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. दुखापतीनंतर संघात परतण्याची आशा असताना तत्कालीन कर्णधार विराट कोहलीने आपल्याला खोटी आश्वासने दिली आणि नंतर फोन व मेसेजला कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा गंभीर आरोप मिश्राने केला आहे.
मिश्रा म्हणाला, “जेव्हा मी दुखापतग्रस्त होतो, तेव्हा अनिल कुंबळे (अनिल भाई) संघाचे प्रशिक्षक होते. मी त्यांना विचारले असता, त्यांनी मला पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर संघात आपोआप पुनरागमन होईल, अशी काळजी न करण्याचे सांगितले होते. त्यानंतर विराट कोहली कर्णधार झाला. मी विराटला याबाबत विचारले असता, त्यानेही तंदुरुस्त झाल्यावर संघात परतशील, असा विश्वास दिला होता.”
मात्र, त्यानंतर विराटने आपला शब्द पाळला नसल्याचे मिश्राने स्पष्ट केले. “मी विराटला (Virat Kohli) विचारले की सद्यस्थिती काय आहे? तेव्हा त्याने मला एक आठवडा किंवा दहा दिवसांत सांगतो असे म्हटले. मात्र एक, दोन, तीन आठवडे उलटूनही मला कोणतीही माहिती मिळाली नाही. मी त्याला फोन केले, पण त्याने उचलले नाहीत. मी मेसेजही केले, मात्र त्याने कोणताही रिप्लाय दिला नाही,” असे मिश्राने सांगितले.
“मी पुन्हा फोन आणि मेसेज केले, पण तरीही उत्तर न आल्याने मी आशा सोडून दिली. जर तो रिप्लायच देणार नसेल तर आपण काय करू शकतो?” अशी खंत मिश्राने व्यक्त केली. तसेच, आपल्यापेक्षा जास्त काळ दुखापतग्रस्त असलेल्या अनेक खेळाडूंनी संघात पुनरागमन केले, पण आपल्याला कधीच उत्तर मिळाले नाही, असेही तो म्हणाला.
दरम्यान, आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी अमित मिश्राची दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तो मुख्य प्रशिक्षक सौरव गांगुली, फलंदाजी प्रशिक्षक युवराज सिंग आणि वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक चामिंडा वास यांच्यासोबत काम करून युवा फिरकीपटूंना मार्गदर्शन करणार आहे.
आयपीएलमध्ये १७४ बळी घेत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत टॉप-१० मध्ये असलेल्या मिश्राने राष्ट्रीय संघासाठीही लक्षणीय कामगिरी केली आहे. २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पणात पहिल्या डावात ७१ धावांत ५ बळी घेऊन त्याने भारताला विजय मिळवून दिला होता. २२ कसोटी सामन्यांत त्याने ७६ बळी घेतले. २०१३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत त्याने १८ बळी घेत जवागल श्रीनाथच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
तो भारताकडून ३६ एकदिवसीय आणि १० टी-२० सामने खेळला असून, त्यात त्याने अनुक्रमे ६४ आणि १६ बळी घेतले आहेत. २०१४ च्या टी-२० विश्वचषकात उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग होता, ज्यामध्ये त्याने १० बळी मिळवले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- मतपेटीचे छिद्र छोटे, ३८ उमेदवारांची मतपत्रिका कशी जाणार? सुधीर मुनगंटीवारांचा निवडणूक प्रक्रियेवर संताप
- मनोज जरांगे ‘डुप्लिकेट मराठा’, त्यांच्या तोंडाला काळं फासणार; एकनाथ शिंदे गटाचा इशारा
- ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटी, सीआयडी चौकशी करा; मनोज जरांगेंची मोठी मागणी
Quick Answers
दुखापतीनंतर संघात परतण्याची आशा असताना तत्कालीन कर्णधार विराट कोहलीने खोटी आश्वासने दिली आणि नंतर फोन व मेसेजला कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा आरोप अमित मिश्राने केला आहे.
अनिल कुंबळे यांनी मिश्राला काळजी न करण्याचा सल्ला दिला होता आणि पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर संघात आपोआप पुनरागमन होईल, असे सांगितले होते.
आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी अमित मिश्राची दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मिश्राने २२ कसोटी सामन्यांत ७६ बळी घेतले असून ३६ एकदिवसीय सामन्यांत ६४ बळी मिळवले आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








