चंद्रपूर, 23 ऑक्टोबर: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ३८ उमेदवारांची नावे असलेली मतपत्रिका घडी केल्यानंतर जाड होते आणि ती मतपेटीच्या छोट्या छिद्रातून सहज आत जात नसल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले.
चंद्रपूर शहरातील एफईएस महाविद्यालयात पदवीधर मतदारसंघासाठी मतदान केल्यानंतर मुनगंटीवार यांनी आपला संताप व्यक्त केला. आचारसंहितेचे कारण देत दुष्काळी प्रश्नांवर बैठक घेऊ न देणाऱ्या निवडणूक आयुक्तांनी मतपेटीच्या छिद्राचा आणि मतपत्रिकेच्या जाडीचा कोणताही विचार केला नसल्याचे ते म्हणाले. तसेच, मतपेटीत मतपत्रिका टाकताना ती फाटल्यास अवैध ठरवली जाऊ नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. भाजपचा बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी मतदार विकासकामांना साथ देतील, असा विश्वास त्यांनी (Sudhir Mungantiwar) व्यक्त केला.
दुसरीकडे, वर्धा येथील बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांनीही मतदान प्रक्रियेत घोळ होण्याची शंका उपस्थित केली आहे. आपला वाढता प्रभाव पाहून अडवणूक करण्याचा कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी केला. चंद्रपूरच्या भिसी येथील मतदान केंद्रावर सहीच्या कारणावरून आपल्या प्रतिनिधीला अडवण्यात आल्याचे सांगत, निवडणूक विभाग भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप कराळे यांनी केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झाली असून, सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत ८.५२ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात एकूण ३२,२६२ मतदार असून त्यांच्यासाठी ५८ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. प्रशासनाने सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची व्यवस्था केली असून, मतदारांना हक्क बजावता यावा यासाठी चार तासांची विशेष सुट्टी देण्यात आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटी, सीआयडी चौकशी करा; मनोज जरांगेंची मोठी मागणी
- फ्री-हिटवर कॅच पकडल्यानंतर नितीश कुमार रेड्डीची लाजिरवाणी चूक; न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील व्हिडिओ व्हायरल
- PSL चा विस्तार! ऑफ-सीझनमध्ये ‘सिक्स-ए-साइड’ स्पर्धा सुरू करण्याच्या पीसीबीच्या हालचाली
Quick Answers
३८ उमेदवारांची नावे असलेली मतपत्रिका घडी केल्यानंतर जाड होते आणि ती मतपेटीच्या छोट्या छिद्रातून सहज आत जात नाही, असा आक्षेप सुधीर मुनगंटीवार यांनी नोंदवला.
मतपेटीत मतपत्रिका टाकताना ती फाटल्यास अवैध ठरवली जाऊ नये, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
चंद्रपूरच्या भिसी येथील मतदान केंद्रावर आपल्या प्रतिनिधीला सहीच्या कारणावरून अडवण्यात आले असून निवडणूक विभाग भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप नितेश कराळे यांनी केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ३२,२६२ मतदारांसाठी ५८ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आली असून मतदारांसाठी चार तासांची विशेष सुट्टी देण्यात आली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








