प्रतिनिधी, 4 ऑक्टोबर: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे जागावाटप समोर आले असून, भाजपला पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधर अशा तीन जागा मिळाल्या आहेत. तर अमरावतीची जागा शिवसेनेला आणि छत्रपती संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाली आहे. या जागावाटपानंतर अनेक इच्छुकांनी बंडखोरीची भूमिका घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही सर्वकाही आलबेल नाही. काँग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटात नाराजीचे वातावरण आहे. या घडामोडी घडत असतानाच, नागपूर पदवीधर मतदारसंघाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नितेश कराळे (Nitesh Karale) यांनी येथून अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
नितेश कराळे निवडणूक लढवण्यावर ठाम असून, आपण येत्या ५ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उमेदवारी अर्ज भरताना मी रॅली काढणार असून, त्यासाठी विविध जिल्ह्यांमधून समर्थक उपस्थित राहतील, अशी माहिती कराळे यांनी दिली. कराळे मैदानात उतरल्यास महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
बेरोजगार लोकांचे प्रश्न, पदवीधरांच्या समस्या, एमपीएससी (MPSC) पेपरफुटीचे मोठे प्रकरण, परीक्षांमधील पारदर्शकता आणि जास्तीत जास्त शासकीय भरती या प्रमुख मुद्द्यांना घेऊन ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी विधानपरिषदेच्या ७ जागा दिल्या, महायुतीने एकही नाही; रामदास आठवलेंची सत्तेत वाटा देण्याची मागणी
- ‘मी त्यांच्यासमोर एकदम शांत असते…’; पूजा बिरारीने सांगितला सासू सुचित्रा बांदेकरांसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा
- मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; हवामान विभागाची अधिकृत घोषणा
Quick Answers
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नितेश कराळे नागपूर पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.
नितेश कराळे येत्या ५ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
बेरोजगार लोकांचे प्रश्न, पदवीधरांच्या समस्या, एमपीएससी पेपरफुटीचे प्रकरण, परीक्षांमधील पारदर्शकता आणि जास्तीत जास्त शासकीय भरती या प्रमुख मुद्द्यांना घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
महायुतीच्या जागावाटपात भाजपला पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधर अशा तीन जागा मिळाल्या आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









