Share

‘मी त्यांच्यासमोर एकदम शांत असते…’; पूजा बिरारीने सांगितला सासू सुचित्रा बांदेकरांसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा

अभिनेत्री पूजा बिरारी हिने सासू सुचित्रा बांदेकर यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा मजेशीर किस्सा आणि सासू-सुनेच्या नात्यातील समजूतदारपणा यावर एका मुलाखतीत भाष्य केले आहे.

Published On: 

Pooja Birari On Suchitra Bandekar

प्रतिनिधी, 3 ऑक्टोबर: सासू-सुनेच्या नात्याबद्दल नेहमीच चर्चा असते. अशातच बांदेकर कुटुंबातील सासू-सुनेची जोडी सध्या चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहमसोबत विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) हिने आपली सासू म्हणजेच सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांच्याबद्दल मोकळेपणाने संवाद साधला आहे.

‘इट्स मज्जा’ला दिलेल्या एका नुकत्याच मुलाखतीत पूजाने सासरच्यांसोबतच्या नात्यावर भाष्य केले. सासूबाई स्ट्रिक्ट आहेत का, या प्रश्नावर बोलताना तिने सुरुवातीला त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटत असल्याचे मान्य केले. कोणी सासू कशी आहे विचारल्यावर आपण मुद्दाम ‘त्या खूप स्ट्रिक्ट आहेत आणि मी त्यांच्यासमोर शांत असते’, असे सांगत असल्याचे ती म्हणाली. मात्र, प्रत्यक्षात त्या खूप गोड असल्याचेही पूजाने स्पष्ट केले.

Pooja Birari On Suchitra Bandekar

पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना पूजा म्हणाली की, सोहमने आईला भेटायचे हे न सांगताच अचानक भेट घडवून आणली होती. अचानक सुचित्रा समोर आल्यावर सरप्राईज टेस्ट असल्यासारखे वाटले आणि पोटात गोळा आला. पण घरी गेल्यावर सुचित्रा बांदेकर यांनी एका वाक्यात तिची भीती घालवली. “या क्षणाला कसे रिअ‍ॅक्ट व्हायचे हे मलासुद्धा कळत नाहीये, आपण दोघी सेम पेजवर आहोत,” असे त्या म्हणाल्या होत्या. न सांगता भेटवल्यामुळे दोघींच्याही मनात त्यावेळी सोहमबद्दल राग होता.

कालांतराने ओळख वाढल्यानंतर सुचित्रा यांनी पूजाला, “मला मुलगी नाहीये, पण मला या सर्व गोष्टींची खूप हौस आहे, त्यामुळे मी गिफ्ट देताना नाही म्हटलंस तर याद राख,” अशी तंबी प्रेमाने दिली होती. आता त्यांच्यात खूप कम्फर्ट आणि समजूतदारपणा असून लग्नापूर्वी मनात असलेली सासूविषयीची धास्ती आता अजिबात उरली नसल्याचे पूजाने सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

अभिनेत्री पूजा बिरारीचा विवाह आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहमसोबत झाला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही