मनोज जरांगे ‘डुप्लिकेट मराठा’, त्यांच्या तोंडाला काळं फासणार; एकनाथ शिंदे गटाचा इशारा

मनोज जरांगे हे ‘डुप्लिकेट मराठा’ असून त्यांच्या तोंडाला काळं फासणार असल्याचा इशारा शिवसेनेचे जालना उपजिल्हाप्रमुख धनंजय पोहेकर यांनी दिला आहे.

Published On: 

Manoj Jarange Patil protest mandap removed in Antarwali Sarati Jalna

जालना, 23 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर शिवसेनेचे जालना उपजिल्हाप्रमुख धनंजय पोहेकर यांनी जोरदार शब्दांत टीका केली आहे. जरांगे हे ‘डुप्लिकेट मराठा’ असून, त्यांनी एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्याची सुपारी घेतली असल्याचा गंभीर आरोप पोहेकर यांनी केला. तसेच, जरांगे यांच्या तोंडाला काळं फासण्याचा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.

मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मोठा बॉम्ब फोडण्याची भाषा केली होती, मात्र पुराव्यांविना त्यांनी केवळ फुसका आणि लवंगी फटाका फोडल्याची टीका पोहेकर यांनी केली. “तुझ्या तोंडाला जालना जिल्ह्यातील शिवसैनिक काळं फासणार हे लक्षात ठेव. तू वरूनही तितकाच काळा आहेस आणि आतूनही तितकाच काळा आहेस,” असा एकेरी उल्लेख करत त्यांनी जरांगेंवर निशाणा साधला.

एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी जरांगे यांना कोणी सुपारी दिली, हे लवकरच उघड करणार असल्याचे पोहेकर म्हणाले. जरांगे हे ९६ कुळी मराठा नसून त्यांनी ‘पाटील’ हे नाव लावू नये, असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हेच खरे ९६ कुळी असून, सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा दावा पोहेकर यांनी केला.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपबाबत देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या संभाषणाची संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. अडीच वर्षांनंतर हे संभाषण बाहेर काढण्यामागे नेमका काय हेतू आहे आणि यातून कोणाला टार्गेट केले जात आहे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

या ऑडिओ क्लिप प्रकरणाच्या चौकशीची मागणी मनोज जरांगे यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानेही केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून यातील सत्य नक्कीच जनतेसमोर आणले जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मनोज जरांगे हे 'डुप्लिकेट मराठा' असून, त्यांनी एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे जालना उपजिल्हाप्रमुख धनंजय पोहेकर यांनी केला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही