🕒 1 min read
अहमदाबाद | IPL 2025 च्या अंतिम सामन्यात विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा असतानाही त्याने फारशी चांगली कामगिरी केली नाही. RCB विरुद्ध पंजाब किंग्सच्या फायनलमध्ये विराटने 35 चेंडूत फक्त 43 धावा केल्या, आणि त्याचा स्ट्राईक रेट होता केवळ 123 ही खेळी संघासाठी निर्णायक ठरणार की नाही हे सामाना संपल्यावर कळेलच.
या संथ खेळीवर माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. त्याने विराटच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सोशल मीडियावर म्हटलं की, “ही खेळी निराशाजनक होती, खेळपट्टी चांगली असूनही विराट पूर्ण ताकदीने खेळला नाही.”
Irfan Pathan Slams Virat Kohli
विराट कोहलीच्या विकेटनंतर इरफान पठाणने X वर लिहिलं – “पंजाबचे गोलंदाज सातत्याने शॉर्ट आणि स्लो चेंडू टाकत होते. विराटचा स्ट्राईक रेट फक्त 123 होता, ही निराशाजनक गोष्ट आहे.”
कोहलीने पॉवरप्लेमध्ये फक्त 1 चौकार मारला, आणि त्यानंतर 10व्या व 14व्या षटकात प्रत्येकी एक चौकार. अखेर अझमतुल्लाहच्या बाउन्सरवर विराटने विकेट गमावली. RCB ने प्रथम फलंदाजी करताना 190 धावा केल्या आहेत.
विराट कोहली: 35 चेंडू – 43 धावा (3 चौकार)
जितेश शर्मा: 10 चेंडू – 24 धावा
पाटीदार, मयंक, लिव्हिंगस्टोन यांनी 20+ धावा केल्या
पंजाबसाठी अर्शदीप सिंग आणि काइल जेमिसन यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.
📌 महत्वाच्या बातम्या
- RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score: बंगळुरू आणि पंजाब यांच्यात थरारक अंतिम सामना
- “अजित पवार पैसे देत नाहीत, मग कामं कशी करायची?” – शिंदे गटात नाराजीचा उद्रेक!
- “शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना” म्हणणाऱ्या पडळकरांना कोर्टाचा मोठा दिलासा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now