Share

Sanju Samson भावूक, सामन्यानंतर केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाला “मी स्वतःवरच…”

ऐतिहासिक विजयानंतर संजू सॅमसनने व्यक्त केल्या भावना. अनेकदा स्वतःवरच संशय असायचा असं सांगत धोनी आणि विराटबद्दल केला मोठा खुलासा.

Published On: 

Sanju Samson Emotional: संजूचा विराट, धोनीबाबत मोठा खुलासा

Sanju Samson | क्रिकेटच्या मैदानात कधी कुणाचं नशीब चमकेल आणि कोण हिरो ठरेल, हे सांगता येत नाही. पण जेव्हा एखाद्या खेळाडूचा मोठा संघर्ष फळाला येतो, तेव्हा त्याच्या भावना लपून राहत नाहीत. टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर Sanju Samson असाच काहीसा भावूक झाला.

‘मॅन ऑफ द मॅच’चा किताब स्वीकारताना त्याने आपला आजवरचा संघर्ष तर सांगितलाच, पण धोनी, विराट आणि रोहित शर्मा यांच्याबाबत एक मोठा खुलासाही केला आहे.

संजूने मनातली खंत थेट बोलून दाखवली. तो म्हणाला, “देशासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिल्यापासून मी नेमक्या याच एका खेळीची वाट पाहत होतो. माझ्या या प्रवासात अनेक चढउतार आले. मी स्वतःवरच अनेकदा शंका घ्यायचो की मी खरंच इथवर पोहोचू शकेन का? पण आजच्या या दिवसासाठी मी देवाचा खूप आभारी आहे.”

Sanju Samson भावूक, धोनी आणि विराटबद्दल काय म्हणाला संजू?

कधी संघात तर कधी संघाबाहेर, अशा कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी त्याला कुणाची साथ मिळाली? यावर बोलताना संजूने थेट दिग्गजांची नावे घेतली.

“विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांच्यासारख्या दिग्गजांकडून मी खूप काही शिकलो. परिस्थितीनुसार ते आपला खेळ कसा बदलतात, हे मी जवळून पाहिलं आणि त्याचा मला आज प्रचंड फायदा झाला,” असं संजूने आवर्जून सांगितलं.

आजची खेळी त्याच्यासाठी का खास होती? तर मैदानात परिस्थिती थोडी वेगळी होती. तो जेव्हाही मोठे फटके मारायला जायचा, तेव्हा दुसऱ्या बाजूने विकेट पडत होत्या. त्यामुळेच आज त्याने डोकं शांत ठेवून फक्त ‘मेरिट’वर चेंडू खेळण्यावर भर दिला.

संजूच्या मते, हा त्याच्या आयुष्यातील सर्वात महान आणि अविस्मरणीय दिवस आहे. आता या दमदार खेळीमुळे Sanju Samson याचं संघातलं स्थान आणखी पक्कं झालंय, असं म्हणायला नक्कीच हरकत नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही