Share

NEET 2026 निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थ्यांना यश, असा पाहा तुमचा निकाल

पेपरफुटीनंतर झालेल्या NEET UG 2026 पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, 11.25 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि आर्यन गुप्ता व पांशुल बन्सल यांनी 715 गुणांसह संयुक्त अव्वल स्थान पटकावले आहे.

Published On: 

NEET Result

🕒 1 min read

NEET UG 2026 Result : पेपरफुटीमुळे पुन्हा घेण्यात आलेल्या NEET परीक्षेचे निकाल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) हे निकाल रात्री उशिरा प्रसिद्ध केले. ३ मे रोजी झालेली मूळ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर, २१ जून २०२६ रोजी २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच सत्रात (single shift) ही पुनर्परीक्षा दिली.

या प्रवेश परीक्षेला बसलेले उमेदवार आता NEET च्या अधिकृत संकेतस्थळावर (neet.nta.nic.in) त्यांचे निकाल पाहू शकतात. NTA च्या माहितीनुसार, पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांशुल बन्सल यांनी संयुक्तपणे ७२० पैकी ७१५ गुण मिळवून सर्वोच्च स्थान पटकावले आहे.

भारतातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. ७०५ हून अधिक गुण मिळवणारे अव्वल १७ विद्यार्थी प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू आणि तेलंगणा या आठ राज्यांमधील आहेत.

निकाल कसा तपासावा?

  • सर्वप्रथम, उमेदवारांनी NTA NEET च्या अधिकृत संकेतस्थळाला (neet.nta.nic.in) भेट द्यावी.
  • त्यानंतर होम पेजवर ‘Latest News’ च्या निळ्या पट्टीमध्ये उपलब्ध असलेल्या ‘NEET UG 2026 Result’ या लिंकवर वे.
  • एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना त्यांची लॉगिन माहिती (login details) भरावी लागेल.
  • माहिती भरल्यानंतर आणि ‘Submit’ बटणावर क्लिक केल्यानंतर, निकाल स्क्रीनवर दिसेल आणि उमेदवार तो डाउनलोड करू शकतील.

विद्यार्थ्यांना भविष्यात सहज उपलब्ध व्हावेत यासाठी, उमेदवारांच्या मूळ OMR उत्तरपत्रिका आणि गुणपत्रिकांच्या (scorecards) स्कॅन केलेल्या प्रती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘डिजी लॉकर’ (DigiLocker) मध्ये सुरक्षितपणे साठवल्या जातील. वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया आणि समुपदेशनाचे (counseling) वेळापत्रक वेळेवर पूर्ण व्हावे यासाठी निकाल त्वरित जाहीर करण्यात आल्याचे NTA ने सांगितले. ११.२५ लाख उमेदवार उत्तीर्ण

या वर्षीच्या परीक्षेत एकूण ११.२५ लाख उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत, ज्यामध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण एकूण संख्येच्या ५८ टक्क्यांहून अधिक आहे. अंतिम गुणवत्ता यादीत (merit list) स्थान मिळवणाऱ्या उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार १७ ते १९ वयोगटातील आहेत. ७२० पैकी ६९० हून अधिक गुण मिळवणारे १३८ विद्यार्थी आहेत आणि विशेष म्हणजे, त्यापैकी ९३ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

  • अतुल्या बाळासाहेब डोंगरे
  • श्रावणी कृष्णा कुदळे
  • मोहनीश मारुती भोसले
  • सार्थक महेश पाटील
  • सानिध्यां क्षितिज डोंगरे
  • अर्णव लाहोटी
  • प्रणव पुरणलाल टेम्भूर्णे
  • रौशमीत गुप्ता
  • सोहम निशिकांत पाटील
  • सागर राजेश करीकर
  • सौम्या बदोले
  • अनुश्री अजय थोरात
  • आर्या अभिजित दिवेकर
  • सहिम सादिक पटवेगार
  • सुहाना सलीम शेख
  • अमीर वरावल्लाह
  • सार्थक पेठकर
  • श्रीवल्लभ विष्णुपंत गावडे

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही