Share

IND vs WI – संजू सॅमसनचा झंझावात, टीम इंडियाचा विश्वचषकात ऐतिहासिक विजय; पण ‘त्या’ ३ धावांमुळे काय घडलं?

टीम इंडियाने टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजचे १९६ धावांचे आव्हान ५ गडी राखून पार केले. संजू सॅमसनच्या ९७ धावांच्या वादळी खेळीने नवा इतिहास रचला आहे.

Published On: 

IND vs WI T20 Match: संजू सॅमसनचा धमाका, भारताचा ऐतिहासिक विजय

🕒 1 min read

IND vs WI – टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारताने जे आजवर कधीच केलं नव्हतं, ते आज रात्री घडलं! १९६ धावांचं महाकाय आव्हान टीम इंडिया सहज पार करेल, असा विचार तरी कोणी केला होता का?

पण संजू सॅमसनने काल मैदानात अक्षरशः वादळ आणलं. त्याच्या (Sanju Samson) ९७ धावांच्या वादळी खेळीपुढे वेस्ट इंडिजचे गोलंदाज अक्षरशः लोटांगण घालताना दिसले.  प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने रोव्हमन पॉवेल आणि जेसन होल्डर यांच्या तुफानी भागीदारीच्या जोरावर २० षटकांत १९५ धावांचा डोंगर उभा केला होता. भारतीय गोलंदाजांची अखेरच्या षटकांत चांगलीच धुलाई झाली होती.

IND vs WI T20 World Cup 2026 | Sanju Samson

विजयासाठी भारतासमोर १९६ धावांचे कठीण लक्ष्य होते. त्यातच ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (१८ धावा) स्वस्तात माघारी परतल्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

पण संजू सॅमसनने एका बाजूने भक्कमपणे किल्ला लढवला. त्याने मैदानभर फटकेबाजी करत इंडिजच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्याला युवा तिलक वर्माने १४ चेंडूंत ३२ धावा कुटत अत्यंत मोक्याच्या क्षणी भक्कम साथ दिली.

सामना शेवटच्या षटकांत पोहोचला तेव्हा श्वास रोखून धरायला लावणारा थरार पाहायला मिळाला. हार्दिक पांड्याही १५ धावा करून तंबूत परतला. संजू शतकाच्या अगदी उंबरठ्यावर होता, पण विजयासाठी फक्त काही धावांची गरज असताना त्याचे हे ऐतिहासिक शतक अवघ्या ३ धावांसाठी हुकले.

शतक पूर्ण झाले नसले, तरी संजूने (Sanju Samson) भारताला एकहाती विजय मिळवून दिला. भारताने १९.२ षटकांत ५ गडी गमावून १९९ धावा करत या रोमहर्षक सामन्यात बाजी मारली.

विश्वचषकाच्या इतिहासात एवढे मोठे लक्ष्य पार करत टीम इंडियाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. संजूच्या या जिगरबाज खेळीचे आता जगभरातून कौतुक होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!