🕒 1 min read
IND vs ZIM | चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या टी २० वर्ल्ड कपच्या सुपर ८ च्या महत्त्वाच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ७२ धावांनी धुव्वा उडवला आहे. या अत्यंत निर्णायक लढतीत भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर उत्कृष्ट खेळ करत उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत ४ बाद २५६ धावांचा विशाल डोंगर उभा केला. सुरुवातीला संजू सॅमसन २४ धावांवर बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. अभिषेकने (Abhishek Sharma) सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत अवघ्या ३० चेंडूत ४ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ५५ धावा कुटल्या. त्याला साथ देत ईशाननेही २४ चेंडूत ३८ धावांची उपयुक्त खेळी केली.
IND vs ZIM T20 World Cup 2026
कर्णधार सूर्यकुमार यादवने १३ चेंडूत जलद ३३ धावा करत संघाची धावगती वाढवली. पण खऱ्या अर्थाने शेवटच्या ५ षटकांमध्ये हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि तिलक वर्मा यांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. हार्दिकने अवघ्या २३ चेंडूत नाबाद ५० धावा ठोकल्या. तर दुसऱ्या बाजूने तिलक वर्माने केवळ १६ चेंडूत ४४ धावांची वादळी खेळी करत भारताला अडीचशे धावांचा टप्पा पार करून दिला.
विजयासाठी २५७ धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या संघाला २० षटकांत ६ बाद १८४ धावांपर्यंतच मजल मारता आली. सुरुवातीला ब्रायन बेनेटने आक्रमक फटकेबाजी करत थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत झिम्बाब्वेच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करू दिली नाही. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंड्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले.
📌 महत्वाच्या बातम्या
- हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरचा नवा लूक; काळ्या ड्रेसमधील ग्लॅमरस अवतार, पाहा हटके PHOTO
- लाडकी बहीण योजना; खात्यात १५०० रुपये जमा व्हायला सुरुवात, पण ‘त्या’ एका चुकीमुळे लाखो महिलांचे पैसे अडकले!
- अजितदादांच्या शोकसभेत जॅकलीनची अचानक एंट्री; ‘त्या’ व्हायरल व्हिडिओने राजकीय वर्तुळात खळबळ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











