📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

अजितदादांच्या शोकसभेत जॅकलीनची अचानक एंट्री; ‘त्या’ व्हायरल व्हिडिओने राजकीय वर्तुळात खळबळ!

अजितदादांच्या वरळीतील शोकसभेत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस अचानक पांढऱ्या कपड्यांत पोहोचली. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून जोरदार चर्चा रंगली आहे.

Published On: 

Jacqueline Fernandez Video: अजितदादांच्या शोकसभेत जॅकलीन!

🕒 1 min read

राजकारणात कधी काय होईल आणि कोण कुठे दिसेल, याचा नेम नसतो. आता हेच बघा ना, महाराष्ट्राला चटका लावून गेलेल्या एका बड्या नेत्याच्या शोकसभेत थेट बॉलिवूड अभिनेत्री पोहोचली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मंगळवारी सायंकाळी वरळीच्या NSCI Dome मध्ये एक अत्यंत भावूक शोकसभा पार पडली. अनेक दिग्गज नेते आणि मनोरंजन विश्वातील कलाकार दादांच्या आठवणीत अश्रू ढाळत होते. सभागृहात अत्यंत जड आणि भावूक वातावरण होतं.

Jacqueline Fernandez Video

पण याच शोकसभेत एका अनपेक्षित उपस्थितीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ती उपस्थिती होती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिची! पांढऱ्या रंगाचा साधा पोशाख आणि चेहऱ्यावर मास्क अशा वेशात ती अत्यंत शांतपणे या सभेला पोहोचली. तिचा हा Jacqueline Fernandez Viral Video सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जॅकलीन अचानक अजितदादांच्या शोकसभेला का आली? असा प्रश्न साहजिकच नेटकऱ्यांना पडलाय. तुम्हाला आठवत असेल, गेल्या वर्षी जॅकलीन आणि अजितदादांचा मुलगा पार्थ पवार एका मंदिरात एकत्र दिसले होते. तेव्हाही सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या होत्या.

आता पुन्हा एकदा या दुःखद प्रसंगी जॅकलीनची एन्ट्री झाल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. शोकसभेतील तिचा गंभीर आणि संयमी अंदाज सध्या राजकीय आणि मनोरंजन विश्वात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!