Share

हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरचा नवा लूक; काळ्या ड्रेसमधील ग्लॅमरस अवतार, पाहा हटके PHOTO

प्रियदर्शनी इंदलकरने काळ्या रंगाच्या बनारसी सिल्क ड्रेसमध्ये नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले आहे. यावर अभिनेत्री वनिता खरातची मजेशीर कमेंट व्हायरल होत आहे.

Published On: 

Priyadarshini Indalkar Look: प्रियदर्शनीच्या फोटोंनी खळबळ!

तुम्हाला वाटतं का की पारंपरिक कपड्यांमध्ये फक्त सोज्वळच दिसता येतं? तर मग ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम या अभिनेत्रीचा नवा लूक तुम्हाला नक्कीच क्लीन बोल्ड करेल. नेहमी प्रेक्षकांना खळखळून हसवणारी ही अभिनेत्री आता तिच्या फॅशन सेन्सने भल्याभल्यांना घायाळ करत आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) सध्या सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. तिच्या एका ताज्या फोटोशूटने इंटरनेटचा पारा चांगलाच वाढवलाय. नेहमी साध्या किंवा कॉमेडी अंदाजात दिसणाऱ्या प्रियदर्शनीचा हा नवा अवतार पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत.

Priyadarshini Indalkar Look

प्रियदर्शनीने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात तिने काळ्या रंगाचा बनारसी सिल्क को-ऑर्ड सेट परिधान केलाय. पारंपरिक बनारसी कापड आणि त्याला दिलेला ऑफ-शोल्डर ब्लाऊज अन् स्लिट स्कर्टचा आधुनिक टच, असा तिचा Priyadarshini Indalkar हा नवा फॅशन स्टेटमेंट सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

या ग्लॅमरस लूकला तिने मोठ्या कुंदन झुमक्यांची आणि एका रॉयल अंगठीची जोड दिली आहे. विशेष म्हणजे, तिने केस मोकळे सोडत अगदी साधा मेकअप ठेवल्याने तिचं नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलून आलंय. फोटोमध्ये तिचा आत्मविश्वास स्पष्टपणे झळकत आहे.

तिच्या या कॉन्फिडंट आणि हटके लूकवर चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत. पण खरी खळबळ उडवली ती तिची मैत्रीण आणि सहकलाकार वनिता खरातच्या कमेंटने! प्रियदर्शनीचा हा हॉट अवतार पाहून वनिताने थेट “मी मेले…” अशी भन्नाट कमेंट केली आहे.

वनिताच्या या एका मजेशीर कमेंटमुळे प्रियदर्शनीचे हे फोटो सोशल मीडियावर आणखीनच तुफान व्हायरल होत आहेत. पारंपरिकतेला असा मॉडर्न तडका कसा द्यायचा, हे नक्कीच आता तिच्याकडून शिकण्यासारखं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही