🕒 1 min read
बारामती | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी 2020 मध्ये शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांनी पवार यांना “महाराष्ट्राला लागलेला कोरोना” असं म्हटल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, बारामती न्यायालयाने आज या प्रकरणात निकाल देताना पडळकर यांना निर्दोष मुक्त केलं आहे.
कोरोनाच्या काळात पत्रकार परिषदेत पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर कोर्टाने समन्स बजावले, हजर न राहिल्याने अटक वॉरंटही निघालं होतं.
Gopichand Padalkar Acquitted for Sharad Pawar Corona Remark
या खटल्यात एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. अखेर न्यायालयाने आज निकाल देताना नमूद केलं की, पडळकर यांच्या विधानामुळे कुठल्याही जातीय दंगली उसळल्या नाहीत, तसेच त्यांचं विधान कोणत्याही समाजविरोधात नसून व्यक्तिविरोधात होतं. त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण झाल्याचा आरोप सिद्ध झाला नाही, आणि याच आधारावर त्यांची निर्दोष मुक्तता झाली.
पडळकर यांचं नेमकं विधान काय होतं?
“शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत. त्यांची भूमिका बहुजनांवर अन्याय करणारी आहे. ते ना कोणत्या विचारधारेचे आहेत, ना त्यांचं स्पष्ट व्हिजन आहे. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाचं राजकारण करायचं आहे,” असं पडळकर यांनी म्हटलं होतं.
📌 महत्वाच्या बातम्या
- iPhone 17 मध्ये काय असू शकते खास? जाणून घ्या डिटेल्स
- रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का? – सुषमा अंधारेंचा खोचक सवाल
- महिला आयोग अपयशी, रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या – रोहिणी खडसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now