Share

रोहित-विराट गायब, गिल-मंधाना किंग! BCCI च्या मोठ्या घोषणेने क्रिकेट वर्तुळात खळबळ

BCCI च्या Naman Awards 2026 ची घोषणा झाली आहे. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये रोहित-विराटचे नाव नसून, शुबमन गिल आणि स्मृती मंधानाला सर्वोच्च पुरस्कार जाहीर झालाय.

Published On: 

BCCI Naman Awards Shubman Gill Smriti Mandhana best cricketer trophy

🕒 1 min read

BCCI Naman Awards | रोहित शर्मा आणि विराट कोहलीने भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले, त्यांचं नावच बीसीसीआयच्या सर्वोच्च वैयक्तिक पुरस्कारांच्या यादीतून गायब असल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यांच्या वार्षिक पुरस्कारांची मोठी घोषणा केली आहे. येत्या १५ मार्च २०२६ रोजी नवी दिल्लीत हा दिमाखदार सोहळा पार पडणार असून, विद्यमान खेळाडूंसह माजी दिग्गज, कोच आणि अंपायर्सचाही यात सन्मान केला जाणार आहे.

BCCI Naman Awards 2026

यंदाच्या BCCI Naman Awards मध्ये भारताचा कसोटी आणि वनडे कर्णधार शुबमन गिल याने बाजी मारली आहे. त्याला सलग दुसऱ्यांदा ‘पॉली उमरीगर’ (बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर) पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. दुसरीकडे, स्मृती मंधानानेही महिलांमध्ये हा सर्वोच्च पुरस्कार पटकावला असून, हा पुरस्कार स्वीकारण्याची तिच्या करिअरमधील ही पाचवी वेळ असेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत क्रिकेटमध्येही युवा खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे. मुंबईच्या ईरा जाधवला ‘जगमोहन दालमिया ट्रॉफी’, तर हरियाणाच्या शेफाली वर्माला वनडेमधील बेस्ट परफॉर्मन्ससाठी हाच मानाचा पुरस्कार दिला जाणार आहे.

लिमिटेड ओव्हर्समध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या आयुष म्हात्रेला आणि रणजी ट्रॉफीत गाजलेल्या विदर्भाच्या हर्ष दुबेला ‘लाला अमरनाथ पुरस्कार’ जाहीर झालाय. त्यामुळे महाराष्ट्रातील क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसंच, सीझनमध्ये तब्बल चार विजेतेपदे पटकावणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) पुन्हा एकदा बेस्ट परफॉर्मन्सचा अवॉर्ड मिळणार आहे.

असं असलं तरी, या सोहळ्यात एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षणही पाहायला मिळेल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (२०२५), टी-२० वर्ल्ड कप (२०२६) जिंकणाऱ्या सीनियर पुरुष टीमसह एकूण पाच विश्वविजेत्या भारतीय संघांचा एकाच मंचावर खास सन्मान होणार आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांना यंदा वैयक्तिक पुरस्कार नसले तरी, विश्वविजेत्या संघाचे महत्त्वाचे सदस्य म्हणून त्यांचा या सोहळ्यात एकत्रित सन्मान होणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!