Share

‘जयराम चाटे येतोय, तुला कृष्णा आंधळे दाखवतो’; भररस्त्यात तरुणावर सपासप वार, बीड पुन्हा हादरलं!

बीडमध्ये जयराम चाटे तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वीच त्याच्या नावाने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. सपासप वार झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Published On: 

Beed Crime News youth attacked with sharp weapons in Kaij

बीड | गुन्हेगारीच्या घटनांनी बीड जिल्ह्याला जणू काही ग्रहणच लागलंय की काय, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. भरदिवसा रस्त्यात अडवून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.

केज तालुक्यातील तांबवा गावात गुरुवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी जयराम चाटे तुरुंगातून तात्पुरता बाहेर येण्याच्या एक दिवस आधीच, त्याच्या नावाने गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला आहे.

Beed Crime News: डोळ्यात मिरची पूड फेकत सपासप वार

नरसिंग ऊर्फ संग्राम चाटे (वय २५) हा तरुण त्याच्या एका मित्रासोबत दुचाकीवरून शेताकडे चालला होता. त्याचवेळी दया चाटे, शरद चाटे आणि त्यांच्या इतर तीन साथीदारांनी संग्रामचा पाठलाग करून दुचाकी अडवली.

हल्लेखोरांनी आधी संग्रामच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि नंतर लोखंडी रॉड अन् कत्तीने त्याच्यावर सपासप वार केले. “तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे १३१३ तुला दाखवतो, तुला आज जिवंत सोडणार नाही!” अशी अमानुष धमकी देत हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.

या रक्तरंजित हल्ल्यात संग्राम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जीवघेण्या हल्ल्यामागे जुनीच खुन्नस आणि राजकारण असावे. याप्रकरणी केज पोलिसांनी पाचही संशयितांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दुसरीकडे, मुख्य आरोपी जयराम चाटे याला भावाच्या बाराव्यासाठी शुक्रवारी कडेकोट बंदोबस्तात गावात आणण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्याचा नेहमीचा रस्ता बदलला. तब्बल १० सशस्त्र कमांडो आणि पोलिसांच्या गराड्यात त्याला अवघ्या दोन तासांसाठी गावात नेऊन तात्काळ पुन्हा बीड कारागृहात पाठवण्यात आले. असं असलं तरी, या नव्या हल्ल्यामुळे तांबवा आणि आजूबाजूच्या परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.

सदर बातमी प्राथमिक माहिती आणि पोलीस तक्रारीवर आधारित आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, केज पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही