Share

नसरापूरनंतर जुन्नर हादरलं; 10 वर्षीय मुलीची हत्या, संशयित आरोपी ताब्यात

पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये १० वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या प्रकरणात २५ वर्षीय संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Published On: 

Junnar minor girl murder case

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे काही दिवसांपूर्वी माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली होती. एका ६५ वर्षीय व्यक्तीने तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता आणि सर्वत्र संताप व्यक्त केला गेला होता.

ही घटना ताजी असतानाच आता पुण्यात पुन्हा तशीच एक घटना घडली आहे. परिसरातीलच एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

ही घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर (Junnar ) तालुक्यातील पिंपळवंडी येथे घडली, जिथे एका १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. पीडित मुलगी मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होती. रात्री साडे-नऊच्या सुमारास त्याच गावातील ‘लेंडस्थळ’ भागात ओढ्यालगतच्या एका झाडाजवळ तिचा मृतदेह आढळून आला.

Junnar minor girl murder case

मुलीच्या बेपत्ता झाल्याबाबत कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर, आळेफाटा पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांनी एका २५ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विशेष म्हणजे, मुलीचा शोध सुरू असताना हा संशयित गावकऱ्यांमध्ये मिसळत होता आणि पोलिसांसोबत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यातही सहभागी होत होता. मात्र, तपासादरम्यान पोलिसांचा संशय बळावला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी पीडितेच्या घराच्या जवळच राहत होता. ओळखीचा फायदा घेऊन त्याने त्या अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून जवळच असलेल्या शेतात नेले. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली.

सध्या पोलीस आरोपीची या घटनेबाबत कसून चौकशी करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते; पोलीस अधीक्षकांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि तपासाबाबतची माहिती घेतली.

दरम्यान, फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात संतापाची लाट उसळली असून, ग्रामस्थांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही