Share

“अजित पवार पैसे देत नाहीत, मग कामं कशी करायची?” – शिंदे गटात नाराजीचा उद्रेक!

Shinde camp ministers express anger over Ajit Pawar for blocking funds; Eknath Shinde assures to talk with CM.

Published On: 

Nana Patole offer CM post to Ajit Pawar and Eknath Shinde

मुंबई | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांची आज महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत शिंदे यांनी प्रत्येक मंत्र्याशी ‘वन टू वन’ चर्चा केली. मंत्रालयीन कामकाजाचा आढावा घेताना, सर्वच मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.

“पैसेच मिळत नाहीत, मग आम्ही काय करणार?” शिंदे गटाच्या सगळ्याच मंत्र्यांनी अजित पवार यांच्या विरोधात सूर लगावला होता. निधी पोहोचत नाहीये, मग कामं कशी करायची? अजित पवार आमच्या विकास कामांवर खोडा घालत आहेत”, असा आरोप मंत्र्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यासमोर केला. निधी न मिळाल्यामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

Eknath Shinde Ministers Angry at Ajit Pawar Over Funds

मंत्र्यांच्या तक्रारी ऐकून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना सांगितलं की, “मी स्वतः अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मार्ग काढतो.” यावेळी एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना बजावलं की, फाइल्स पेंडिंग ठेवू नका, कामं वेळेत पूर्ण करा, सामान्य लोकांशी संपर्क ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही