Share

हगवणे प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे! सुषमा अंधारेंकडून जालिंदर सुपेकरांनवर गंभीर आरोप

Sushma Andhare reveals political links in Vaishnavi Hagawane case; demands CID probe into Supkar, PI Chavan.

Published On: 

Vaishnavi Hagawane Case: Sushma Andhare Demands CID Probe into Supkar, PI Chavan, Chonde Family

मुंबई | वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला आता राजकीय रंग चढताना दिसत आहे. हगवणे कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी यांचा सहभाग या प्रकरणात असल्याचं समोर आलं आहे.

महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांनी सांगितलं की, “वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठा राजकीय हस्तक्षेप आहे. या प्रकरणात जालिंदर सुपेकर आणि त्यांचा मेव्हण्या पीआय शशिकांत चव्हाण यांची चौकशी झाली पाहिजे.”

Sushma Andhare exposes political links in Hagawane case

जालिंदर सुपेकर हे वैष्णवीच्या सासरच्यांचे नातेवाईक असून, खडक पोलीस ठाण्याचे पीआय शशिकांत चव्हाण हे सुपेकर यांचे मेव्हणे असल्याचे अंधारे यांनी सांगितलं. पीआय चव्हाण यांच्याकडेच चोंधे कुटुंबाच्या दोन सुनांचे गंभीर प्रकरण दाखल होते. शिवाय, पुण्यात शशिकांत चव्हाण यांच्या नावावर अब्जोंच्या मालमत्तेच्या साईट्स असल्याचंही सांगितलं जात आहे.

हगवणे यांना पळून जाण्यास मदत करणारे सुयश चोंधे यांच्या पत्नी धनश्री यांनी गंभीर आरोप केले आहेत. “मुलगी झाली म्हणून त्रास दिला, माहेरून पैसे मागितले, मानसिक व शारीरिक छळ झाला,” असा आरोप करत त्यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. मात्र, अद्याप काहीही कारवाई झाली नाही.

सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. तसेच, सुपेकर आणि चव्हाण यांच्या बेहिशोबी संपत्तीचीही चौकशी करावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही