🕒 1 min read
PBKS vs MI : IPL 2025 च्या क्वालिफायर-2 सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सवर (PBKS vs MI) 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळलेल्या या सामन्यात पंजाबने 204 धावांचं लक्ष्य केवळ 6 चेंडू राखून गाठलं.
या विजयात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाबाद 87 धावा करत निर्णायक भूमिका बजावली. त्याच्या भेदक खेळीच्या जोरावर पंजाबने 2014 नंतर प्रथमच फायनलमध्ये मजल मारली.
PBKS vs MI: Captain Hardik bursts into tears after defeat
दुसरीकडे, मुंबईसाठी हा पराभव धक्कादायक ठरला. 204 धावांचं मोठं लक्ष्य देऊनही मुंबईचे गोलंदाज अपयशी ठरले. विशेषतः जसप्रीत बुमराहने निराशा केली. त्याला एकही विकेट मिळाली नाही. फिल्डिंगमध्येही चुका झाल्या; ट्रेंट बोल्टने निर्णायक क्षणी नेहल वढेराचा कॅच टाकला, ज्यामुळे सामन्याचं चित्र पालटलं.
पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अत्यंत भावूक झाला. तो मैदानातच बसून डोळ्यांत अश्रू अनावर करत होता. रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंच्याही चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. निता अंबानीही खिन्न mood मध्ये दिसल्या.
पंजाब आता फायनलमध्ये 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी भिडणार आहे. अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘हाऊसफुल 5’च्या अॅडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद; काही तासांतच कोट्यवधींची कमाई
- ‘आम्ही पती-पत्नी होऊच शकत नाही…’; गर्लफ्रेंड गौरी आणि पूर्व पत्नींबद्दल काय म्हणाला आमिर खान?
- मुंबईची ‘ती’ सर्वात मोठी चूक, पंजाब किंग्स विजयी; IPL ट्रॉफीसाठी आरसीबीशी भिडणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now